|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रहिवाशी दाखल्यासाठी लाच स्विकारताना पोलीस पाटील जेरबंद

रहिवाशी दाखल्यासाठी लाच स्विकारताना पोलीस पाटील जेरबंद 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

   रहिवाशी दाखला देण्यासाठी 450 रूपयांची लाच स्विकारताना निगवे दुमाला (ता. करवीर) येथील पोलीस पाटलास लाचलुचपत विभागाने रंगेहाथ जेरबंद केले. शिवाजी तुकाराम सुतार (वय 52 रा. निगवे दुमाला ता. करवीर) असे लाचखोर पोलीस पाटलाचे नांव आहे. याबाबताची फिर्याद दत्तात्रय दादु गुरव (रा. केर्ली ता. करवीर) यांनी दिली होती.

    याबाबत अधिक माहिती अशी की, दत्तात्रय गुरव यांची जाखले (ता. पन्हाळा) येथे वडीलोपार्जीत 15 गुंठे जमिन आहे. सदरची जमीन दादु गुरव यांचे नावावर आहे. काही दिवसांपूर्वी दादू गुरव यांचे निधन झाले आहे. सदरच्या जमीनीवर दत्तात्रय गुरव यांची आई, भाउ, बहिण यांची नावे लावण्यासाठी गुरव यांनी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधला. यावेळी त्यांना केर्ली गावच्या पोलीस पाटलांकडून रहिवाशी दाखला आणण्यास सांगीतले. केर्ली गावचे पोलीस पाटील सध्या सेवानिवृत्त असल्याने निगवे दुमाला येथील शिवाजी सुतार यांच्याकडे केर्ली गावाचा प्रभारी चार्ज आहे. दत्तात्रय गुरव यांनी रहिवाशी दाखल्यासाठी शिवाजी सुतार यांची निगवे दुमाला गावी जावून भेट घेतली. यावेळी सुतार यांनी रहिवाशी दाखल्यासाठी 1 हजार रूपये खर्च येईल मात्र तुम्ही 700 रूपये द्या अशी मागणी केली. यावेळी दत्तात्रय गुरव यांनी सुतार यांना तलाठी कार्यालयात देण्यासाठी केलेले ऍफिडेव्हीटही सादर केले. ऍफिडेव्हीट बघितल्यानंतर सुतार यांनी गुरव यांच्याकडे 450 रूपयांची मागणी केली. सोमवार (4 डिसेंबर) रोजी गुरव यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून शिवाजी सुतार यांच्याविरोधात तक्रार दिली. यानंतर गुरव यांनी पुन्हा सुतार यांच्याशी संपर्क साधून सात वारसांची नावे रहिवाशी दाखला देण्यासाठी 420 रूपयांची मागणी केली. व लाचेची रक्कम घेवून गुरव यांना निगवे दुमाला येथील धोंडीराम सुतार यांच्या गॅरेजमध्ये मंगळवारी सकाळी बोलाविले. यानुसार लाचलुचपतविभागाने मंगळवारी दुपारी सुतार यांच्या गॅरेजमध्ये सापळा रचून

Related posts: