|Sunday, October 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सेवानिवृत्तीनिमित्त अंजना निकम यांचा पुष्पनगर प्रशालेत सत्कार

सेवानिवृत्तीनिमित्त अंजना निकम यांचा पुष्पनगर प्रशालेत सत्कार 

प्रतिनिधी/ गारगोटी

कुमार भवन, पुष्पनगर (ता. भुदरगड) या माध्यमिक प्रशालेतील कर्मचारी श्रीमती अंजना आश्राप्पा निकम यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सदिच्छा समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. प्रशालेच्या माजी शिक्षिका सौ. सुनंदा गणेश जोशी यांच्या हस्ते त्यांना साडीचा आहेर व चांदीची लक्ष्मी मूर्ती देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे माजी मुख्याध्यापक ए. आर. बामिष्टे सर होते.

कार्यक्रमाची सुरवात प्रशालेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली. त्यांना एस. एन. बाणे व पी. एल. मौर्य यांनी संगीत साथ दिली. प्रशालेचे मुख्याध्यापक के. ए. देसाई यांनी प्रास्ताविकातून अंजना निकम यांच्या सेवेचा आढावा घेतला. यावेळी तिरवडे हायस्कूल व ज्यु. कॉलेजचे मुख्याध्यापक गायकवाड, प्रशालेचे सहा. शिक्षक आर. पी. बहादुरे, सौ. आर. व्ही. बडवे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी विशेष उपस्थित शिक्षण विभाग पंचायत समिती, भुदरगडचे विस्तार अधिकारी दीपक मेंगाणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व श्रीमती अंजना निकम यांच्या सेवाभावी वृत्तीचा आदर्श जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. व्ही. ए. पाटील यांनी केले तर आभार डी. बी. देसाई यांनी मानले.

यावेळी छ. शिवाजी शिक्षण संस्था पुष्पनगरचे उपाध्यक्ष व के. एच. कॉलेज, गारगोटीचे उपप्राचार्य पी. ए. देसाई, संस्थेचे सचिव राजेंद्र देसाई, माजी मुख्याध्यापक एस. टी. देसाई, जी. डी. देसाई, आर. बी. गवेकर यांच्यासह प्रशालेचे आजी माजी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष पी. डी. पोतदार व विविध शाळातील शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी, श्रीमती निकम यांचा मित्रपरिवार, ग्रामस्थ व विद्यार्थी वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता.

 

Related posts: