|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रक्तदान या युगातील श्रेष्ठ दान – डॉ. आनंद

रक्तदान या युगातील श्रेष्ठ दान – डॉ. आनंद 

प्रतिनिधी/ चंदगड

रक्तदान हे या युगातील सर्वश्रेष्ठ दान आहे. आपत्तीच्या काळात, अपघातात अचानक रक्ताची गरज भासते. शेवटी माणसाचे माणसाशी रक्ताचे नाते निर्माण होते. -असे प्रतिपादन बेळगावच्या केएलई हॉस्पिटलचे डॉ. आनंद यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते.

चंदगड येथील र. भा. माडखोलकर जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ते बोलत होते.

डॉ. आनंद पुढे म्हणाले, रक्तदानासंबंधीचे गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकीतून केलेले कार्य सध्या व्यापक स्तरावर पोहोचले आहे. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी रक्तदानामुळे कोणतीही शारीरिक झीज होत नाही. रक्ताची निर्मिती निसर्गनियमाने आपोआपच होत असते. प्रत्येक सुदृढ व्यक्ती रक्तदान करू शकते, असे सांगितले. प्रा. एस. डी. गावडे यांनी देशाच्या सीमेवर जवान रक्त सांडतात तितकेच नागरिकांचे रक्तदानही महत्वाचे असल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक अशोक पवार, हवालदार संग्राम पाटील व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Related posts: