|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अमर रहे, अमर रहे, बाबासाहेब अमर रहे

अमर रहे, अमर रहे, बाबासाहेब अमर रहे 

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वारण दिनाच्या पूर्वसंध्येला शहरात कँडल मार्च

प्रतिनिधी/ कोल्हापूर

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बुधवारी महापरिनिर्वाण दिन आहे. या महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर शहरातील विविध संस्था – संघटनांच्या वतीने कँडल मार्च काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. अमर रहे, अमर रहे बाबासाहेब अमर रहे अशा घोषणांनी बाबासाहेबांचा जागर करण्यात आला.

6 डिसेंबर 1956 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. या दिवशी मुंबई दादर येथील चैत्यभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी एकवटतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याबरोबरच त्यांच्या विचारांचा जागर होतो. तसेच देशाच्या काना -कोपऱयातही बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला जातो.

महापरिनिर्वाण दिनाच्या या पूर्वसंध्येला कोल्हापूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. विविध संस्था संघटनांच्या वतीने शहरात कँडल मार्च काढण्यात आला. माजी खासदार एस.के.डिगे मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने दसरा चौकातून कँडल मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये साई हायस्कूलचे विद्यार्थी सहभागीं झाले होते. दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळयास अभिवादन करुन हा कँडल मार्च पुढे बिंदू चौकात गेला. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन आणि मेणबत्ती प्रज्वलित करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी बाबासाहेब अमर रहेच्या घोषणांनी बिंदू चौक दुमदुमला. यावेळी सदानंद डिगे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना स्वत:ला तपासून पाहणे गरजेचे आहे. आपण स्वत:ला त्यांचे अनुयायी समजत असू तर त्यांच्या कार्यकतृत्वाला कुठेही कमीपणा येणार नाही असे आपण वागले पाहिजे. यावेळी इंदूमती बोर्डिंगचे राजाराम कांबळे, मिस क्लार्क बोर्डिंगचे विणकरे, विनय कुमार, छात्रालयाचे एम.एम. कांबळे, हिंद कन्या छात्रालयाच्या अधीक्षीका वंदना कांबळे, राजन कदम, महादेव कांबळे, अशोक भास्कर, योगेश डिगे यांच्यासह विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

Related posts: