|Saturday, December 15, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » यशवंत सिन्हांचे आंदोलन मागे

यशवंत सिन्हांचे आंदोलन मागे 

नागपूर :

महाराष्ट्रातील शेतकऱयांच्या समस्या सोडविण्यासा”ाr सरकारविरुद्ध अकोला येथे सर्जिकल स्ट्राईक करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी पेंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी केलेल्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर बुधवारी अकोल्यातील शेतकरी आंदोलन मागे घेण्यात आले. मुख्यमंत्र्यांशी त्यांची फोनवरून चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्यानंतर यशवंत सिन्हा यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.

मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्या असल्या तरीही या आंदोलनाला विजय-पराजयाच्या दृष्टीने पहात नाही. दु:खी असलेल्या माणसाचा विजय आहे. हा लाभ राज्यातील सर्व शेतकऱयांना मिळेल, असा विश्वास यशवंत सिन्हा यांनी अकोला येथे व्यक्त केला. यावेळी यशवंत सिन्हा यांनी आता येथील शेतकरी आत्महत्या करणार नाही असे अभिवचन द्या, असेही शेतकऱयांना आवाहन केले. शेतकऱयांनो कमजोर बनू नका. शेतकऱयांना समस्या आल्या तर शेतकरी जागर मंचासोबत संपर्क करा, असे आधारयुक्त आवाहनही सिन्हांनी केले.

Related posts: