|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » क्रिडा » भारत, ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत

भारत, ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत 

वृत्तसंस्था / भुवनेश्वर

विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाने हॉकी वर्ल्ड लीग फायनल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविताना स्पेनचा 4-1 अशा गोलफरकाने धुव्वा उडविला. दुसऱया उपांत्य सामन्यात भारताने बेल्जियमला पेनल्टी शूटआऊटमध्येही बरोबरी झाल्यानंतर सडनडेथमध्ये 3-2 असा पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. गोलरक्षक आकाश चिकटे भारतीय विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने तीन गोल वाचवत बेल्जियमची आगेकूच रोखली.

दुसऱया उपांत्य सामन्यात भारताने बेल्जियमवर पेनल्टी शूटआऊटमध्येही बरोबरी झाल्यानंतर सडनडेथवर 3-2 असा सनसनाटी विजय मिळवित उपांत्य फेरी गाठली. निर्धारित वेळेत दोन्ही संघांत 3-3 अशी बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्येही दोघांनी 2-2 गोल नोंदवले. त्यानंतर सडनडेथवर हरमनप्रीत सिंगने गोल नोंदवत भारताला 3-2 अशी बढत मिळवून दिली. बेल्जियमचा गोल मात्र आकाश चिकटेने थोपवत भारताची उपांत्य फेरी निश्चित केली.

त्याआधी ब्लेग गोव्हर्सने दोन, ऍरोन क्लीनश्मिट (48) व जेरेमी हेवर्ड (28 वे मिनिट) यांनी ऑस्ट्रेलियाचे गोल नोंदवले. स्पेनचा एकमेव गोल मार्क गार्सियाने नोंदवला. पूर्वार्धात ऑस्टेलियाने पूर्ण वर्चस्व राखत स्पेनवर सतत आक्रमणे केली. पण   पहिले यश मिळाले ते स्पेनला. जेरेमी एडवर्ड्सने डिफ्लेक्ट केलेला चेंडू गार्सियाकडे गेला. त्याने तो गोलपोस्टमध्ये धाडून स्पेनला आघाडीवर नेले. मध्यंतरास दोन मिनिटे असताना ड्रग फ्लिकर जेरेमी हेवर्ड्सने पेनल्टी कॉर्नरवर ऑस्ट्रेलियाला बरोबरी साधून दिली. सामन्याच्या तिसऱया सत्रात कोणालाही गोल नोंदवता आला नाही. पण चौथ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने पेनल्टी कॉर्नर्सवर तीन गोल नोंदवून स्पेनचे आव्हान संपुष्टात आणले. क्लीनश्मिटने दुसरा गोल नोंदवल्यानंतर ब्लेक गोव्हर्सने एका मिनिटांत दोन गोल नोंदवून ऑस्टेलियाची आघाडी 4-1 अशी केली आणि हीच आघाडी कायम राखत विजय साकार केला.

Related posts: