|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » …माऊलीची माया होता माझा भिमराया !

…माऊलीची माया होता माझा भिमराया ! 

प्रतिनिधी/ सोलापूर

चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भिमराया….! अशी भावना व्यक्त करत महापरिनिर्वाण दिनी बुधवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना, पक्ष, अधिकारी तसेच आबाल वृध्द समाजबाधवांनी अभिवादन केले.

मध्यरात्री बारा वाजल्यापासून मिलिंद नगर येथे डॉ. आंबेडकर अस्थिविहार प्रेरणा भूमी, सम्राट चौक येथील आंबेडकर उद्यान व पार्क स्टेडियम जवळील डॉ. आंबेडकर पुतळा येथे अभिवादनासाठी रांग लागली होती. सकाळी डॉ. आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. पुष्प वाहून मेणबत्ती प्रज्वलीत करीत सामूहिक बुध्दवंदना घेवून समाज बांधवानी अभिवादन केले.

समता सैनिक दलातफ्xढ मानवंदना 

बुधवारी सकाळी समता सैनिक दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. ज्येष्ठ गायिका रूक्मीणी सरतापे व धोंडाबाई नागटिळक यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी जीओसी भुंजगराव गायकवाड, मुंकूद शिवशरण, राजू गायकवाड, दत्ता सिध्दगणेश, सुनिता गायकवाड, अरूण गायकवाड, विजय कांबळे, प्रकाश घटकांबळे, रविकुमार गुरणे, विजयालक्ष्मी सिध्दगणेश, सुजित हावळे, लक्ष्मी शिंदे, सुचित्रा थोरे आदीसह सैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

भारतीय बौध्द महासभा

भारतीय बौध्द महासभेच्यावतीने डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सामुदायिक बुध्दवंदना घेण्यात आली. त्यानंतर समता सैनिक दलाच्यावतेने मानवंदना देण्यात आली. यावेळी भन्ते बी. सारीपुत्त, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत साळवे, प्रभाकर लांडगे, नागसेन माने, धम्मरक्षिता कांबळे, मिनाक्षी बनसोडे, राजू बाबरे, ज्ञानेश्वर बनसोडे, सुधाकर गायकवाड, गौतम जगझाप, विजय साळवे, आशा शिवशरण आदीची उपस्थिती होती.

विविध संस्थातफ्xढ रक्तदान शिबीर

संकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन रिपाईचे प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कामगार नेते भालचंद्र साखरे, अध्यक्ष प्रसेनजीत शिंगे, श्रावण चंदनशिवे, रोहित जाधव, अतिश धेंडे, महेश तळभंडारे, विश्वजित गायकवाड आदीची प्रमुख उपस्थिती होती. तसेच भिमशक्ती सामाजिक संस्था, युवक पँथर यांच्यावतीने रक्त्दान शिबीर घेण्यात आले.

पुस्तक व साहित्याचे स्टॉल्सवर गर्दी

डॉ. आंबेडकर चौकात पुस्तक व साहित्याच्या स्टॉलवर खरेदीसाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. डॉ. आंबेडकर यांच्यासह आंबेडकरी साहित्याविषयी पुस्तके विक्रीला आली होती.

अस्थिविहार प्रेरणाभूमी येथे अभिवादन

मिलिंद नगर येथील डॉ. आंबेडकर अस्थिविहार प्रेरणा भूमी येथे मध्यरात्री भारतीय बौध्द महासभेच्यावतीने सुत्तपठण झाले. सकाळी पालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस आयुक्त महादेव तांबडे, उपमहापौर शशिकला बत्तुल, नगरसेवक आनंद चंदनशिवे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

विविध संस्था संघटनातफ्xढ अभिवादन

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, माकपाचे माजी आ. नरसय्या आडम, युसूफ्ढ मेजर, अनिल वासम,  के. डी. कांबळे, सिध्दू पांडगळे, किरण निंकबे, विकास सरवदे, बसपाच्यावतीने ऍड. संजीव सदाफ्gढले, आप्पासाहेब लोकरे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, देवा उघडे, कामगार नेते अशोक जानराव, जनार्दन शिंदे, विकास चौधरी, भाजपाचे शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी, नागेश पासकंटी, अशोक कटके, बशीर डोका, मोची समाज संघटनेतफ्xढ अध्यक्ष देवेंद्र भंडारे, बसवराज म्हैत्रे, संजय हेमगड्डी, हणमंतू सायबोळू, सिद्राम अट्टेलूर, नागनाथ कासलोलकर, बाबा करगुळे, यल्लाप्पा तुपधोळकर, पिपल्य रिपब्लिकर पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजा इंगळे, रिपाइं (गवई) चे प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे, विनोद इंगळे, एमआयएमचे नगरसेवक तौफ्ढिक शेख, बहुजन शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष आण्णसाहेब भालशंकर, रमेश लोखंडे, बी. जी. गायकवाड यांच्यासह विविध सामाजिक संस्था संघटनातफ्xढ अभिवादन करण्यात आले.

Related posts: