|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अवैध हातभट्टी दारु वाहतूक वाहनावर कारवाई

अवैध हातभट्टी दारु वाहतूक वाहनावर कारवाई 

प्रतिनिधी/सोलापूर

गुरूनानक चौकात बुधवारी पहाटेच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. चारचाकी वाहनातून 1280 लिटरचे दारू विक्रीसाठी नेण्यात येत होते.

श्रीकांत सुरेश राठोड (वय 25), विजय शंकर राठोड (वय 32), हुसेन खेमु राठोड (वय 35) आणि रमेश कपुरचंद राठोड (सर्व रा. मुळेगाव लमाण तांडा, द. सोलापूर) यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाटे पेट्रोलिंग करीत असताना गुरूनानक चौकात पांढऱया रंगाची सुमो (क्र. एमएच 13, एन-6555) संशयितरित्या येताना दिसून आली. पोलिसांनी गाडी पाहताचा सुमो जोरात पळविले. सदर गाडीची पाठलाग करीत पत्रकार भवन येथे अडविण्यात आले. त्यावेळी गाडीची तपास केली असता पाठिमागील बाजूस हातभट्टी दारूचे 16 टय़ुब दिसून आल्या. यात 1280 लिटरचे 1 लाख 64 हजार 800 रूपये किंमतीचे हातभट्टी दारूसह टाटा सुमो जप्त करण्यात आले.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, नागेश व्हटकर, संजय बायस, मंजुनाथ मुत्तनवार, जयसिंग भोई, राहुल गायकवाड, मंगेश भुसारे, स्वप्नील कसगावडे, सोमनाथ सुरवसे यांनी पार पाडली.

Related posts: