|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » राष्ट्रवादी भाजपाच्या वळचणीला कदापीही जाणार नाही : संग्रामसिंह पाटील

राष्ट्रवादी भाजपाच्या वळचणीला कदापीही जाणार नाही : संग्रामसिंह पाटील 

वार्ताहर/ आष्टा

सत्तेतून बाहेर पडल्यावर राष्ट्रवादी भाजपासोबत जाईल अशी भिती शिवसेनेला वाटते आहे. मात्र राष्ट्रवादी कदापीही भाजपाच्या वळचणीला जाणार नाही. शिवसेनेने शेतकऱयांच्या तसेच सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी संघर्ष करायला हवा, असे प्रतिपादन वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांनी केले.

आष्टा येथे युवक राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष व प्रगतीशील शेतकरी सुनील माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात संग्रामसिंह पाटील बोलत होते. यावेळी नगरसेवक जगन्नाथ बसुगडे, वीर कुदळे, साखर कारखान्याचे संचालक माणिक शेळके, शिवसेनेचे हणमंतराव सुर्यवंशी, संभाजीराव सुर्यवंशी, युवकचे अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष उदय कुशिरे, दिपक शिंदे, प्रभाकर जाधव, सुनील जाधव, संग्राम जाधव, व्ही.डी.पाटील,अनिल बोंडे, आनंदराव आटुगडे, प्रदीप ढोले, गुंडाभाऊ आवटी, अमोल पडळकर, महेश गायकवाड, दिपक मेथे, शरद आटुगडे, दादासो शेळके, उद्योजक रवी पाटील, सतीश पाटील, हणमंत कदम, शहाजी डोंगरे, रणजीत पाटील, ऍड. अभिजीत वग्याणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना संग्रामसिंह पाटील पुढे म्हणाले, सुनील काका हे प्रबळ इच्छाशक्ती असणारे व्यक्तिमत्व आहे. नेत्यांच्याप्रती त्यांनी आयुष्यभर निष्ठा जपली आहे. आ.जयंतराव पाटील, व दिलीपतात्या पाटील यांनी त्यांच्यातील चळवळीचे गुण हेरले व त्यांना राजकारणात संधी दिली. काकांनी विविध अडचणीवर मात करुन स्वतःचे व्यक्तिमत्व घडविले आहे. पदयात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी पार्टी शेतकरी तसेच सामान्यांचे प्रश्न सरकारपुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवसेनेनेही सामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरायला हवे. इंद्रप्रस्थ हा नेत्यांपर्यंत जाणारा नॅशनल हायवे आहे. या हायवेला टोलनाका नाही. या रस्त्यावरचा प्रवास सुखकर होतो. तसेच इच्छीतस्थळी लवकरही पोहचता येते. सुनीलकाका हे इंद्रप्रस्थ नॅशनल हायवेवर आहेत. त्यामुळे ते निश्चितपणे ध्येयापर्यंत पोहचतील यात शंका नाही.

यावेळी बोलताना हणमंतराव सुर्यवंशी म्हणाले, सुनीलकाकांनी सामान्यांच्या प्रश्नावर आयुष्य वेचले आहे. समाजातल्या प्रत्येक घटकास न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. ते उत्तम शेतकरी आहेत. एकत्र कुटुंबपध्दती जपण्याचाही प्रयत्न त्यांनी केला आहे.

वीर कुदळे म्हणाले, सध्याच्या काळात घराणेशाही चालत नाही. कर्तृत्वानांचाच गौरव होत असतो. खा. राजू शेट्टींच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱयांची मते भाजपाच्या पारडयात पडली. पण भाजपाने खासदार राजू शेट्टींना गंडविले आहे. संग्रामसिंह पाटील हे चांगले काम करीत आहेत. शेतकऱयांच्या प्रश्नासाठी 4 ते 5 हजार युवकांचा मोर्चा त्यांनी तहसील कार्यालयावर काढला होता. भविष्यात उत्तम कार्यकर्ता घडविण्यासाठी शिबीरे घेण्याची आवश्यकता आहे.

Related posts: