|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उदयनराजेंच्या हस्ते ब्लँकेट्सचे वाटप

उदयनराजेंच्या हस्ते ब्लँकेट्सचे वाटप 

प्रतिनिधी/ सातारा

रिमांड होममधील अनाथ मुले चांगले शिक्षण घेत आहेत. ज्यांना कुटुंबाचा आसरा नाही अशी मुले रिमांड होममध्ये दाखल होत असतात. सातारच्या रिमांड होममधील पोरक्या असलेल्या मुलांना आभाळाची सावली आणि मायेची उब यापुढेही आपण अखंडपणे देत राहु, मुलांना जाणवणारी आई-वडिलांची उणीव आम्ही स्वतः भरुन काढु, असे उत्कट भावोद्गार खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने, रिमांड होम मधील 104 शाळकरी मुलांना, थंडीपासून संरक्षण करण्याकरीता उबदार ब्लॅकेट्स आणि कानटोप्यांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी उदयनराजे भोसले औपचारिक बोलत होते. नगराध्यक्षा माधवीताई कदम, उपनगराध्यक्ष राजु भोसले, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सविताताई फाळके, उपसभापती सुनिता पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

सभापती सविताताई फाळके व उपसभापती सुनिता पवार यांच्या पुढाकाराने रिमांड होममधील अनाथ मुलांना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लॅकेटस आणि उबदार कानटोप्यांचा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्याला कोणीही नाही त्याच्या पाठीशी आमचे नेते खासदार उदयनराजे भोसले हे पहाडासारखे खंबीर उभे असतात, याचीच प्रचिती आजच्या कार्यक्रमामधुन  येण्याबरोबरच, एक वेगळे समाधान प्रत्येक सातारकरांना नगरपरिषदेच्या या घेतलेल्या निर्णयामुळे लाभणार आहे. एक चांगला निर्णय नगरपरिषदेने घेतला तो  निश्चितच स्वागतार्ह आहे असे गौरवोद्गार नगराध्यक्षा माधवी कदम यांनी यावेळी व्यक्त केले.

रिमांड होममधील लहान मुलांना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लॅकेटसचे वाटप करा अशा सूचना उदयनराजे यांनी मला केल्या होत्या. त्याची तातडीने अंमलबजावणी आज सर्वांच्या सहकार्याने केली गेली.  रिमांड होममधील मुलांच्या डोळयात जी चमक पहायला मिळाली त्यामुळे एक वेगळाच आनंद मिळाला अशी प्रतिक्रीया सविता फाळके यांनी  यावेळी व्यक्त केली.

याप्रसंगी नगरसेवक श्रीकांत आंबेकर, ज्ञानेश्वर फरांदे, मनोज शेंडे, नगरसेविका स्नेहा नलवडे, सीता हादगे, राम हादगे, नगरपरिषदेच्या भांडार विभागाकडील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related posts: