|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राजश्री जाधव यांचा माणदेशी उद्योजिका पुरस्काराने गौरव

राजश्री जाधव यांचा माणदेशी उद्योजिका पुरस्काराने गौरव 

प्रतिनिधी / वडूज

निमसोड (ता.खटाव) येथील ग्रामीण उद्योजिका राजश्री तानाजी जाधव यांचा सातारा येथे झालेल्या माणदेशी महोत्सवात माणदेशी उद्योजिका पुरस्काराने गौरव करण्यात आला. मराठी अभिनेत्री निवेदिता जोशी (सराफ) यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, उपाध्यक्ष जवाहर देशमाने, उदय गुजर, सचिन अगरवाल, रेखा कुलकर्णी, वनिता शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलताना सराफ म्हणाल्या, सौ. जाधव यांच्या सारख्या कर्तबगार महिलांमुळे खटाव माणच्या अर्थकारणात चांगली भर पडली आहे. श्रीमती सिन्हा म्हणाल्या, सर्वसामान्य महिलांना स्वत:च्या पायावर स्वावलंबी बनविण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत.

दरम्यान, या पुरस्काराबद्दल सौ. जाधव यांचे निमसोड परिसरातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

Related posts: