|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » उड्डाण पुलाच्या कामात कुठ्ठाळीतील जल वाहिनी फुटली

उड्डाण पुलाच्या कामात कुठ्ठाळीतील जल वाहिनी फुटली 

प्रतिनिधी / वास्को

पणजी मडगाव मार्गावरील कुठ्ठाळी येथे झुआरी पुलाच्या उड्डाण पुलाच्या कामात भुमीगत जलवाहिनीला धक्का लागून ती जलवाहिनी फुटली. ही घटना सकाळी अकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कुठ्ठाळी, आगशी या भागातील पाणी पुरवठय़ावर काही प्रमाणात परीणाम झाला.

झुआरी नदीवर बांधण्यात येणाऱया नवीन पुलाला जोडणासाठी कुठ्ठाळीतील महामार्गावर उड्डाण पुलासाठी खोदकाम चाललेले आहे. या रस्त्याच्या मधोमध पुलासाठी खांब घालण्यात येणार आहेत. याच कामात व्यस्त असलेल्या एका अवजड क्रेनचा तोल जाऊन पेन रस्त्यावर कोसळण्याची घटना रविवारी घडली होती.  शनिवारीही अशीच एक घटना घडली होती. त्यामुळे सतत दोन दिवस पणजी मडगाव मार्गावरील वाहतुक तब्बल साडे तीन तास कोंडीत सापडली होती. याच उड्डाण पुलाच्या खोदकामामुळे काल बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास भुमीगत जलवाहिनी फुटण्याची घटना घडली. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या या वाहिनीला रस्ता खणणाऱया यंत्राचा धक्का लागून ही वाहिनी फुटली व रस्त्यावरच सर्वत्र पाणीच पाणी झाले. तेथील कामगारांनी लगबग करून जलवाहिनीतील पाण्याला वाट करून दिल्याने तेथील दुकाने व घरे दारे सुरक्षीत राहिली.

या घटनेमुळे कुठ्ठाळी तसेच आगशी परीसरातील पाणी पुरवठय़ावर परीणाम झालेला आहे. या जल वाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आलेले असून आज सकाळपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.

Related posts: