|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मच्छिमार मंत्र्याकडून पारंपारिक मच्छिमाऱयांवर अन्याय

मच्छिमार मंत्र्याकडून पारंपारिक मच्छिमाऱयांवर अन्याय 

प्रतिनिधी/ पणजी

 मच्छिमार मंत्री विनोद पालयेकर हे पारंपारिक मच्छिमाऱयांवर अन्याय करत असून त्यांनी आज या मच्छिमाऱयांना अडचणीत आणले आहे. या मच्छिमाऱयांना मिळणारे  अनुदानही बंद करण्याचा निर्णय तसेच परराज्यात आयात करण्यात येणाऱया मासळीवर कर लावण्याचा जो निर्णय घेतला आहे तो पारंपारिक मच्छिमाऱयांच्या विरोधात आहे, असे यावेळी ‘ऑल गोवा फिशरमॅन फोरमचे’ सचिव सायमन परेरा यांनी सांगितले.

 पारंपारिक मच्छिमाऱयांच्या अनेक मसस्या आहे त्या समस्या न सोडविता उलट या मच्छिमाऱयांना मिळणारे अनुदान बंद करण्याचे तसेच परराज्यात आयात केल्या जाणाऱया मासळीवर कर लावण्याचा हा निर्णय घेतला आहे यामुळे पारंपारिक मच्छिमाऱयांचा व्यावसाय बंद पडणार आहे. सध्या हा व्यवसाय करणे खूप कठीण झाले आहे. सरकारकडून मिळणाऱया अनुदानावर हा व्यवसाय चालतो. जर हे अनुदानच बंद केले तर हा व्यवसाय कसा चालणार. गोवा फोरवर्ड हा पक्ष गोय गोयगांर गोयकारपण अशा नारा देत असेल तर या पक्षाच्या मंत्र्यांनी असा निर्णय घेणे चुकीचे आहे. कारण मच्छिमारी करणारे हे सर्व पारंपारिक मच्छिमार हे स्थानिक गोमंतकीय आहे. विनोद पालयेकर हे मंत्री विजय सरदेसाई व दुर्गादास कामत यांच्या सांगण्यावरुन तो असे निर्णय घेत आहे. त्यांना स्वतःचा असा काही अभ्यास नाही. जर त्यांना हे मंत्रीपद सांभाळता येत नसेल तर त्यांनी पदाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्र्यांनी हे पद घ्यावे असे यावेळी या संघटनेचे अध्यक्ष आग्नेल रॉड्रिग्ज यांनी सांगितले. .

मडगांव मासळी मार्केट माफियांच्या ताब्यात

 पारंपारिक मच्छिमाऱयांसाठी बांधण्यात आलेले मडगाव येथील मासळी मार्केट हे आता माफियांचे झाले आहे. त्या ठिकाणी असलेल्या मौलाना इब्राहीम यांनी या मार्केटचा ताबा घेतला आहे. तो सर्व व्यवसाय तिकडून करत आहे. परराज्यातून या मार्केटमध्ये सात ते आठ मोठे ट्रक भरुन मासळी येतात. या ट्रक मागे 10 टक्के त्याला कमिशन मिळत असते. दिवसाला लाखो रुपये त्यांना मिळत असतात. यामुळे स्थानिक मच्छिमाऱयांवर अन्याय होत आहे. तसेच पराराज्यातील निर्यातदारांना मिळणारे करोडो रुपयांचे अनुदान बंद करावे यासाठी आज सर्व पारंपारिक मच्छिमाऱयांच्या संघटनांना एकत्र येण्याची गरज आहे, असे माजी आमदार बेन्जामीन सिल्वा यांनी सांगितले.

विजय सदरसाई यांचा मौलाना यांना पाठींबा

 मडगांव मासळी मार्केटचा ताबा हा मंत्री विजय सदसाई यांच्या हातात आहे. इब्राहीम मौलाना यांना विजय सरदेसाई याचा पाठींबा मिळत आहे. ते दोघे मिळून हा व्यावसाय करत आहे. मंत्री विनोद पालयेकर हे नावाला मच्छिमार मंत्री आहे सगळी सुत्रे विजय सरदेसाई चालवत आहे. त्यामुळे जे मडगाव मासळी मार्केट माफियांच्या ताब्यात गेले आहे त्याला विजय सरदेसाई यांचा पाठींबा आहे. यात पारंपारिक मच्छिमाऱयांवर अन्याय केला जात आहे. या माफियांमुळे आज मासळीच्या किंमती वाढल्या आहे. असे  बेन्जामीन सिल्वा यांनी सांगितले.

 मडगाव मासळी मार्केट हे सरकारच्या मत्सीमार खात्याने ताब्यात घ्यावे माफियामुळे आज मासळी महाग झाली आहे या दलालांमुळे लोकांना महाग मासळी खावी लागत आहे. उलट माच्छिमार मंत्री पारपांरिक मच्छिमाऱयांना सहकार्य न करता आपल्याला   हवे तसे निर्णय घेत आहे. याला पारंपारिक मच्छिमाऱयांचा विरोध आहे. आता जो 2 कोटी रुपये खर्च करुन मासळी महोत्सव पणजी येथे आयोजित करण्यात येणार आहे त्यासाठी पारंपारिक मच्छिमाऱयांना विश्वासात घेण्यात आले नाही. उलट त्यांच्यावर अन्याय केला आहे, असे यावेळी हर्षद धोंड यांनी सांगितले.

 सध्या मासेमारीसाठी कामगार मिळणे कठीण झाले आहे आता फक्त झारखंड व ओरिसा या राज्यातील कामगार मिळत आहे. पण त्यांनाही आता सरकारने आधारकार्ड सक्तीचे केल्याने आता हे कामगार मिळणे कठीण झाले आहे यावर सरकारने आता काही तरी तोडगा काढला पाहीजे कामगार मिळाले नाहीतर  मच्छिमाऱयांना धंदा बंद करावा लागणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी या संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts: