|Saturday, October 20, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » राममंदिर प्रश्न राजकारण्यांशी जोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न अवांछनीय

राममंदिर प्रश्न राजकारण्यांशी जोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न अवांछनीय 

अहमदाबाद

राम जन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी काँग्रेस नेते कपील सिब्बल यांनी सुन्नी मुस्लीम वक्फ मंडळाच्या बाजूने केलेला युक्तीवाद आता गुजरातमध्ये प्रचाराचा मुद्दा बनत आहे. या प्रकरणाची सुनावणी 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर घ्यावी, असा आश्चर्यकारक युक्तीवाद सिब्बल यांनी न्यायालयात केला होता. न्यायालयाने तो साफ फेटाळून लावला होता. बुधवारी दाहोद येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच मुद्यावरून काँग्रेसवर जोरदार टिका केली.

काँग्रेस राममंदिर प्रश्नाचे राजकारण करीत आहे. या प्रयत्नात तो पक्ष जनतेच्या भावनांशी खेळत आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रश्नाची सुनावणी लवकरात लवकर करू इच्छीत असताना काँग्रेसचे वकील सिब्बल मात्र सुनावणी टाळण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या या भूमिकेवर त्यांचेच पक्षकार मुस्लीम सुन्नी वक्फ मंडळानेही टिका केली आहे. आम्हालाही या प्रकरणाची सुनावणी समयबद्ध पद्धतीने हवी आहे, असे मंडळाचे म्हणणे आहे. त्यामुळे न्यायालयात सिब्बल नेमकी कोणाची बाजू मांडत होते? असा प्रश्न निर्माण झाला आहे. असा टोला मोदींनी लगावला.

खरा विकास भाजप काळातच

केंद्रात अटलबिहारी वाजपेयी सरकार निवडून आल्यानंतर स्वतंत्र आदंवासी कल्याण मंत्रालय स्थापन करण्यात आले. गुजरातमध्येही आदीवासींचा विकास भाजप कार्यकाळातच झाला. आदीवासी भागांमध्ये पिण्याचे पुरेसे पाणी आणि वीज भाजपच्या काळातच पोहोचली. काँग्रेसने नेहमीच आदीवासींच्या कल्याणाकडे दुर्लक्ष केले, असे टिकाप्रहार केले.

 

संचारबंदी युवकांना माहितच नाही

1995 पूर्वी अर्थात भाजपचे सरकार गुजरातमध्ये येण्यापूर्वी राज्याच्या अनेक भागात दंगली उसळल्या होत्या. कित्येक शहरे आणि मानवी वसत्या महिनोंमहिने संचारबंदीच्या प्रभावाखाली असत. लोकांना अन्नपदार्थ आणि औषधे विकत घेणेही कठीण जात असे. पण, भाजपच्या 22 वर्षाच्या कालखंडात गुजरातमध्ये जातीय शांततात निर्माण झाली आहे. परिणामी आजच्या युवकाला संचारबंदी म्हणजे काय आणि ती असतांना कसे हाल होतात याची कल्पनाही नाही. भाजपने राज्याला सुशासन दिल्यामुळेच संचारबंदीच्या विळख्यातून राज्याची मुक्तता झाली आहे, असे प्रतिपादन मोदीं यांनी केले.

 

Related posts: