|Monday, July 16, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ट्रंम्प यांच्याकडूनही मोदींची स्तुती :योगी

ट्रंम्प यांच्याकडूनही मोदींची स्तुती :योगी 

गुजरातमध्ये निवडणूक प्रचाराला जोर चढला आहे. विविध पक्षांचे मान्यवर नेते आणि फर्डे वक्ते आपापल्या पक्षांच्यावतीने रणांगणात उतरले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात प्रचाराचा धडाका लावला असून, काँग्रेसवर कठोर टिका प्रहार केले आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंम्प यांनीही मोदींची स्तुती केल्याचा उल्लेख आदित्यनाथ यांनी बुधवारी विविध भाषणांमधून केला. मोदींनी ज्याप्रमाणे भारताचा विकास केला आहे. त्याप्रमाणे ट्रंम्प अमेरिकेचा विकास करू इच्छित आहेत असा दावा आदित्यनाथ यांनी केला. यांनी बुधवारी घरीयाधर याय भावनगरमधील ठिकाणी निवडणूक प्रचार सभा घेतली. त्यांनी भाषणात काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांच्यावरही टिका केली.

आयोध्येतील राम मंदिरासंबंधीची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर घ्यावी, अशी मागणी सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावर आदित्यनाथ यांनी टिकास्त्र सोडले. जनतेची इच्छा आयोध्येत भव्य राममंदिर लवकरात लवकर व्हावे, अशी आहे. तर काँग्रेसची इच्छा याप्रकरणाची सुनावणी जास्तीत जास्त लांबणीवर पडावी अशी आहे, असा प्रहार त्यांनी केला.

विकास हाच आधार

विकास हाच देशाचा आणि भाजपचा आधार आहे. याच आधारावर आम्ही जनतेचा कौल मागत आहोत. गुजरातची जनता गेले पाव शतक भाजपच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. यावेळेलाही ती भाजपच्या बाजूने निर्णायक कौल देईल आणि भाजपला विजयी करेल, असा विश्वास आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.

Related posts: