|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रशियाचा पाकिस्तानला दणका

रशियाचा पाकिस्तानला दणका 

अणुपुरवठादार देशांच्या गटात भारताला पाठिंबा   एस. जयशंकर यांनी घेतली रशियाच्या विदेश मंत्र्यांची भे

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अणुपुरवठादार देशांच्या गटामध्ये भारताचा समावेश व्हावा यासाठी रशियाने भक्कम पाठिंबा घोषित केला आहे. चीनकडून भारताला विरोध होत असला तरी रशियाच्या पाठिंब्यामुळे भारताची बाजू अधिक भक्कम झाल्याचे मानण्यात येत आहे. भारताला या गटाचे सदस्यत्व मिळणार असेल तर पाकिस्तानलाही ते मिळू द्यावे, अशी चीनची मागणी आहे. तथापि, भारत आणि पाकिस्तान यांच्यात फरक असून त्यांची तुलना होऊ शकत नाही, असे रशियाने म्हटले आहे.

भारताचे विदेश सचिव एस. जयशंकर यांनी बुधवारी रशियाचे विदेशमंत्री सर्जि रियाबकाव्ह यांची भेट घेतली. त्यावेळी रशियाने आपला पाठिंबा पुन्हा एकदा जाहीर केला. या गटाचे सदस्यत्व मिळावे म्हणून पाकिस्तानने अर्ज केला आहे. तथापि, या अर्जावर एकमत झालेले नाही. तसेच भारताने केलेल्या अर्जाशी पाकिस्तानची तुलना होऊ शकत नाही. ही रशियाची भूमिका रियाबकोव्ह यांनी स्पष्ट केली.

भारताचे इतक्मया उघडपणे समर्थन रशियाच्या एखाद्या ज्ये÷ आणि जबाबदार अधिकाऱयाने करण्याची ही पहिलीच वेळ मानली जात आहे. भारताच्या या गटातील प्रवेशामध्ये अडचणी निश्चित आहेत. तथापि, त्यावर तोडगा काढला जाऊ शकतो, असे रशियालाही वाटते. अणुपुरवठादार देशांच्या नियमांनुसार एका देशाने जरी विरोध केला तरी नव्या अर्जदाराचा प्रवेश रोखला जाऊ शकतो. चीनने सातत्याने भारताच्या अर्जाला विरोध केल्याने भारताचा प्रवेश नियमानुसार सध्या तरी अशक्मय आहे.

चीन आपल्या भूमिकेत बदल करेल, अशी शक्मयता रशियाला वाटत नाही. तथापि, भारताच्या बाजूने प्रयत्न करण्याची त्याची तयारी आहे. भारताचा या गटातील प्रवेश अणुसुरक्षा आणि इतर कारणांसाठी कसा महत्त्वाचा आहे, हे चीनला पटवून देण्याची आवश्यकता आहे. यासाठी रशिया पुढाकार घेऊ शकतो. तथापि, चीनची निश्चिती देता येत नाही, असे आंतरराष्ट्रीय तज्ञांचेही मत आहे.

Related posts: