|Thursday, July 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सुब्रमण्यम स्वामी यांचे राम मंदिरावरील क्याख्यान रद्द

सुब्रमण्यम स्वामी यांचे राम मंदिरावरील क्याख्यान रद्द 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांचे राममंदिरावरील व्याख्यान रद्द करण्याचा निर्णय येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने घेतल्यामुळे विद्यार्थीवर्गात नाराजी पसरली आहे. दोन विद्यार्थी संघटना या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. अयोध्येत राममंदिरच का असावे, असा स्वामींच्या व्याख्यानाचा विषय होता. तथापि, न्यायालयात याविषयी सुनावणी सुरू असल्याने हे व्याख्यान रद्द करण्यात आल्याचे विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

विद्यापीठाच्या पेरियार वसतीगृहात विद्यार्थ्यांनी या निर्णयाच्या निषेधार्थ मिरवणूक काढली. हे व्याख्यान प्रथम विद्यापीठ व्यवस्थापनाने संमत केले होते. तथापि, नंतर डाव्या पक्षांच्या दबावामुळे निर्णय फिरविण्यात आल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला. सुब्रमण्यम स्वामी यांचे मत जाणून घेण्याची आम्हाला इच्छा होती. विद्यार्थीवर्ग एखाद्या मुद्दय़ाच्या सर्व बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यादृष्टीकोनातून स्वामींचे व्याख्यान आम्हाला हवे होते, असे काही विद्यार्थी प्रतिनिधींनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हे व्याख्यान खुले होते. त्यामुळे त्यात वादग्रस्त असे काही नव्हते. तसेच विद्यार्थ्यांना स्वामींची मते पटली असती असे नाही. तरीही विद्यापीठाने दबावाखाली येऊन हा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे, असे सांगण्यात आले.

Related posts: