|Friday, October 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सेनादले राजकारणाच्या बाहेर ठेवणे आवश्यक

सेनादले राजकारणाच्या बाहेर ठेवणे आवश्यक 

नवी दिल्ली :

 भारताच्या सेनादलांना राजकीय क्षेत्राच्या बाहेर ठेवावे, असे प्रतिपादन भूसेना प्रमुख बिपीन रावत यांनी केले आहे. सध्याच्या काळात काही प्रमाणात सेना दलांचे राजकियीकरण करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. मात्र, या प्रयत्नांपासून दूर रहावयास हवे, अशी सूचना त्यांनी केली. तसेच महिलांनाही सेनादलांपासून विशिष्ट अंतरावरच ठेवावयास हवे. अलीकडच्या काळात या दोन्ही बाबींचा सेनांमध्ये प्रवेश वाढला आहे. ही बाब टाळावयास हवी, असे वक्तव्य त्यांनी केले.

देशांतर्गत परिस्थितीमध्ये आणि सीमेवर लष्कराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. लष्कराची कार्यपद्धती धर्मनिरपेक्ष स्वरुपाची आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्हाला नेहमी सज्ज रहावे लागते. त्यामुळे कोणाचीही बाजू घेण्याचे धोरण सेना अवलंबत नाही. सेनेची एकमेव जबाबदारी देशाचे संरक्षण आणि वेळप्रसंग पडल्यास देशांतर्गत परिस्थितीवर नियंत्रण ही आहे असे त्यांनी बोलताना म्हटले.

Related posts: