|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘जाणता राजा’च्या रंगीत तालमीने आणला उत्साह

‘जाणता राजा’च्या रंगीत तालमीने आणला उत्साह 

कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण : नाटय़ पाहण्याची उत्सुकता शिगेला

बेळगाव / प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास रंगमंचावर पाहण्याची संधी तरुण भारत ट्रस्टने बेळगावकरांना ‘जाणता राजा’च्या माध्यमातून दिली आहे. 9 डिसेंबरपासून सीपीएड मैदानावर हा शिवशाहीचा काळ पुन्हा एकदा अवतरणार आहे. सध्या या महानाटय़ाच्या रंगीत तालमीला सुरुवात झाली असून कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तरुण भारत ट्रस्टच्यावतीने जाणता राजा हे जगातील सर्वात मोठे फिरते महानाटय़ पुन्हा एकदा बेळगावात येत आहे. तब्बल 12 वर्षांनंतर हा शिवशाहीचा इतिहास बेळगाववासियांना पाहता येणार आहे. जीवनात एकदा तरी जाणता राजा हे महानाटय़ पाहावे, असे वडीलधारी मंडळी नेहमीच सांगतात. त्यामुळे हे नाटय़ पाहण्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

महानाटय़ अधिकाधिक उत्कृष्ट व्हावे, यासाठी कलाकार मंडळी विशेष मेहनत घेत आहेत. दिवसभराचे काम संपवून रात्री तालमीला वेळेवर उपस्थित राहत आहेत. बुधवारी प्रथमच या 150 कलाकारांची फौज मुख्य रंगमंचावर तालीम करीत होती. त्यामुळे त्यांनाही व्यासपीठाचा आवाका समजण्यास मदत झाली. मुख्य रंगमंचावर रंगीत तालीम करायला मिळाल्याने कलाकारांचा आनंद गगनात मावणारा नव्हता.

चौकट करणे

ऑनलाईन बुकिंगची सुविधा

जाणता राजा महानाटय़ाच्या तिकीट विक्रीला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. परंतु तिकीट विक्री केंद्रे शहर व परिसरापुरती असल्याने गोवा, आजरा, कोल्हापूर या भागातील शिवप्रेमींची गैरसोय होत होती. अखेर शिवप्रेमींच्या आग्रहाखातर ‘बुक माय शो’ या संकेतस्थळावरून बुकींग करण्याची सुविधा  उपलब्ध करून देण्यात येत आहे. गुरुवारपासून सर्व शिवप्रेमींना ही सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.   

Related posts: