|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » व्यापाऱयाच्या लुटीने खळबळ

व्यापाऱयाच्या लुटीने खळबळ 

लुटारूंचा तपास लावण्यात पोलीस अपयशी : तब्बल 24 लाखांची लूट

प्रतिनिधी / बेळगाव

वसुलीसाठी आलेल्या फळ व्यापाऱयाची डोळय़ात मिरचीपूड टाकून लूट करण्याच्या प्रकाराने एकच खळबळ माजली आहे. आझादनगरनजीक घडलेल्या या प्रकाराची माळमारुती पोलीस स्थानकात नोंद झाली आहे. घटना घडून 48 तासांहून अधिक कालावधी उलटला तरीही लुटारूंचा तपास लावण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे.

नारायण मुद्दाप्पा (वय 48, रा. ज्योतीनगरसीरा, तुमकुर) असे त्या व्यापाऱयाचे नाव आहे. सोमवार दि. 4 रोजी रात्री 12 वाजता महामार्गानजीकच्या हॉटेल सागरसमोर ही घटना घडली होती. बससाठी थांबलेल्या व्यापाऱयाच्या डोळय़ात दुचाकीवरून आलेल्या दोघा लुटारूंपैकी एकाने मिरचीपूड टाकली. दुसऱयाने चाकूचा धाक दाखवून त्यांच्या हातातील बॅग हिसकावून घेतली होती.

मुद्दाप्पा हे बेळगावला वसुलीसाठी आले होते. वसुली आटोपून ते आपल्या गावी परत जाणार होते. मात्र, बससाठी थांबले असताना हा प्रकार घडला होता. घटना घडताच लागलीच माळमारुती पोलिसांत दाखल होऊन त्यांनी घटनेची फिर्याद दिली होती. मात्र, अद्याप पोलिसांनी काहीच तपास केला नसल्याचे उघड झाले आहे. या घटनेने मात्र खळबळ उडाली आहे.

हॉटेल सागरनजीक रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची गर्दी असते. त्या ठिकाणाहून महामार्गावरून जाणाऱया खासगी बस पकडल्या जातात. दरम्यान, असे लुटालुटीचे प्रकार होत राहिल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीरपणे निर्माण होणार असून याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज क्यक्त होत आहे.

Related posts: