|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रोहयोचा आढावा घेण्यासाठी डॉ.धुमाळे यांच्या तालुक्मयांना भेटी

रोहयोचा आढावा घेण्यासाठी डॉ.धुमाळे यांच्या तालुक्मयांना भेटी 

बेळगाव /

बेळगाव जिल्हा पंचायतीच्या नरेगा योजनेचे ओंबुड्समन डॉ. ए. जे. धुमाळे हे उद्योग खात्री योजनेचा आढावा घेण्यासाठी विविध तालुक्मयांना भेटी देणार आहेत. त्या ठिकाणी नरेगाबाबत असलेल्या तक्रारी ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱयांना सूचना करणार आहेत. यावेळी सार्वजनिक अहवालही स्वीकारणार आहेत. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे-

दि. 8 रोजी सकाळी 11 वा. चिकोडी, दुपारी 3 वा. अथणी, दि. 14 रोजी सकाळी 11 वा. हुक्केरी, दुपारी 3 वा. गोकाक, दि. 19 रोजी 11 वा. सौंदत्ती, दु. 3 वा. रामदुर्ग, दि. 20 रोजी सकाळी 11 वा. खानापूर, दि. 28 रोजी बैलहोंगल. या योजनेसंदर्भात कोणाच्याही तक्रारी असतील तर त्यांनी लिखित स्वरुपात अथवा प्रत्यक्ष भेटून जिल्हा पंचायत कार्यालयात असलेल्या ओंबुड्समन विभागात आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन डॉ. धुमाळे यांनी केले आहे.