|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आता मारुती गल्लीत रिक्षावाल्यांची रेलचेल

आता मारुती गल्लीत रिक्षावाल्यांची रेलचेल 

प्रतिनिधी/ बेळगाव

शहरातील रहदारीला शिस्त लावण्याच्या मोहिमेचे स्वागत शहरवासियामधून होत असून शहरातील अन्य भागात याप्रमाणे शिस्त लावण्यात यावी अशी मागणी हेऊ लागली आहे. गणपत गल्लीत ही मोहीम राबविण्यात येत असल्याने याठिकाणी ठाण मांडणाऱया फेरीवाल्यांनी आणि प्रवासी रिक्षा चालकांनी आपला मोर्चा मारुती गल्लीत वळविला आहे. यामुळे आता मारुती गल्लीत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

बाजारपेठेत होणाऱया अस्ताव्यस्त पार्किगमुळे वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण होत असल्याने पार्किग सुविधा  सुरळीत करण्याच्या उद्देशाने शिस्त लावण्याची मोहीम रहदारी पोलीस प्रशासनाने हाती घेतली आहे. खडे बाजार, समादेवी गल्ली आदी ठिकाणी या मोहिमेला चांगले यश आले आहे. यामुळे मोहीम टप्प्याटप्याने अन्य परिसरात राबविण्यात येत आहे. सोमवारपासून ही मोहीम गणपत गल्ली परिसरात राबविण्यात येत आहे. याठिकाणी दिवसाआड एका बाजूला वाहने पार्क करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच याठिकाणी गणपत गल्लीमध्ये थांबणाऱया प्रवासी रिक्षा आणि फेरीवाल्यांना रस्त्यावर थांबण्यास मज्जाव केला जात आहे. यामुळे गणपती गल्ली परिसरात वाहतूक कोंडीची समस्या एकदिवसाकरिता होईना पण सुरळीत झाली. पण ही मोहिम निरंतरपणे राबविण्यासाठी याठिकाणी रहदारी  पोलीसांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे वाहतूक रहदारीची समस्या कमी झाली आहे. पण गणपत गल्लीमध्ये ठाण मांडणाऱया फेरीवाल्यांनी आणि रिक्षावाल्यांनी मारुती गल्लीत थांबण्यास प्रारंभ केला आहे. याठिकाणी प्रवासी रिक्षांच्या रांगा लागत असल्याने गल्लीमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. खुल्या झालेल्या रस्त्यावर आता रिक्षाचालकांची रेलचेल वाढली आहे. प्रवासी मिळविण्यासाठी गणपत गल्ली आणि मारूती गल्ली परिसरात रिक्षा फिरविण्यात येत आहेत. यामुळे फेरीवाल्यांची गर्दी कमी झाली मात्र, रिक्षावाल्यांची डोकेदुखी वाढल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे गणपत गल्लीसह मारुती गल्ली परिसरातील रहदारीला शिस्त लावण्यात यावी तसेच याठिकाणी प्रवाशांसाठी रिक्षा  पार्क करून थांबणाऱयांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Related posts: