|Tuesday, July 17, 2018
You are here: Home » Top News » शाळांचे शैक्षणिक शुल्क समान करणार ः विनोद तावडे

शाळांचे शैक्षणिक शुल्क समान करणार ः विनोद तावडे 

 ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यातील सर्व शाळांचे शैक्षणिक शुल्क किमान पातळीवर एकसमान करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी 2011 च्या महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियमात सुधारणा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

राज्यातील शिक्षणसंस्थांकडून आकारल्या जाणाऱया विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये मोठय़ा प्रमाणावर तफावत आढळून येत असून, संस्थाचालकांकडून शैक्षणिक शुल्कात लूट करण्यात येत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून वारंवार येत आहेत. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक शुल्क एकसमान असावे, तसेच शैक्षणिक शुल्क सुधारणेचा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी 6 मे 2017 रोजी निवृत्त न्यायाधीश व्ही. जी. पळशीकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर समितीने सात महिने या कायद्यातील सुधारणांसंदर्भात अभ्यास केला. या कालावधीत समितीने पालकांच्या आणि संस्थाचालकांच्या प्रतिनिधींबरोबर दहा बैठका घेतल्या. शुल्क विनियमन सुधारणांसंदर्भातील अहवाल समितीने बुधवारी राज्य शासनाकडे सादर केला आहे. याचा अभ्यास करून मार्चपूर्वी अधिनियमामध्ये बदल करण्यात येणार आहे.

Related posts: