|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » जामा मशीद ही मशीद नसून जमुना देवी मंदिर ः विनय कटियार

जामा मशीद ही मशीद नसून जमुना देवी मंदिर ः विनय कटियार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दिल्लीतील जामा मशीद ही मशीद नाही, तर जमुना देवीचे मंदिर असल्याचा वादग्रस्त दावा भाजपचे खासदार विनय कटियार यांनी केला आहे. याशिवाय ताजमहाल हे देखील तेजो महालच असल्याचे त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

मोगल राज्यकर्त्यांनी सहा हजार मंदिरे उद्ध्वस्त करुन त्या ठिकाणी ही मशीद बांधली आहे. दिल्लीतील जामा मशीदीच्या जागी जमुना देवीचे मंदिर होते. यापूर्वी मुघलांनी हिंदूची धार्मिक स्थळे उद्धवस्त करण्याचे काम केले आहे. ताजमहल हे देखील हिंदू मंदिर आहे. तिथे देवी-देवतांच्या खुणा दिसून येतात. तसेच ताजमहलमध्ये पावसाळय़ात पाणी गळती होते. ज्या जागेवर हे पाणी गळते, तिथे शिवलिंग होते. ते शिवलिंग हटवून तिथे मजार बांधण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडील माहितीनुसार त्यांनी ऑगस्टमध्ये लेखी स्वरूपात कोर्टात सादर केलेल्या अहवालात ताजमहाल हा तेजो महाल किंवा शंकराचे मंदिर नसल्याचे म्हटले आहे.

Related posts: