|Saturday, January 19, 2019
You are here: Home » Top News » गुजरात निवडणूक; काँग्रेसला इव्हीएमवर विश्वास नाही

गुजरात निवडणूक; काँग्रेसला इव्हीएमवर विश्वास नाही 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला इव्हीएम मशिनवर विश्वास राहिला नाही. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांच्या कार्यकर्त्यांना इव्हीएमच्या सर्व बारीकसारीक माहितीसाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच निवडणूक काळात मोबाईल जॅमरची मागणीही काँग्रेसने केली आहे.

सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि स्वंयसेवी संस्थांच्या मदतीने काँग्रेस आपल्या प्रत्येक उमेदवारांच्या निवडक समर्थकांना इव्हीएम मशिनचे प्रशिक्षण देत आहे. काँग्रेसने 5 टक्के इव्हीएम मशिन्सच्या एक हजारवेळा तपासणीचे निर्देश दिले आहेत. काँग्रेसने कार्यकर्त्यांना इव्हीएम मशीनचे सील तपासण्यास तसेच काँग्रेसच्या चिन्हावरच मतदान होते का, हे तपासण्यास सांगितले आहे.

काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी यूपी निवडणुकीनंतर गुजरात निवडणुकीवर देखील शंका उपस्थित केली आहे. सर्व केंद्र आणि बुथवरील 25 टक्के व्हीव्हीपॅटच्या तपासणीची मागणा देखील त्यांनी केली आहे.

Related posts: