|Thursday, December 14, 2017
You are here: Home » Top News » भ्रष्टाचाराविरोधात करवाई का नाही ः मनमोहन सिंग

भ्रष्टाचाराविरोधात करवाई का नाही ः मनमोहन सिंग 

ऑनलाईन टीम / राजकोट :

यूपीएच्या काळात ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांच्याविरोधात सक्त कारवाई करण्यात आली. मात्र, भाजप सरकार त्यांच्या कार्यकाळात अशा भ्रष्टाचाऱयांविरोधात कारवाई करत नसल्याचा आरोप माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची आज सांगता होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकोट येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. फसलेला नोटाबंदीचा निर्णय, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी, बेरोजगारी तसेच सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही त्यांनी निशाना साधला. तसेच देशाची राष्ट्रीय सुरक्षा सरकारच्या असुरक्षित विदेश नीतींमुळे ढेपाळली आहे.

जीएसटीने मोदींनी व्यापाऱयांना आणि गुजरातींना धोका दिला आहे. नोटाबंदीचा निर्णय हा देशासमोरील संकटं वाढवणारा निर्णय आहे. त्यामुळे देशात मंदीचे सावट आहे. मोदी सरकारने घेतलेले निर्णय हे देशहिताचे नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Related posts: