|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » ‘लव्ह जिहाद’वरुन तरुणाच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल

‘लव्ह जिहाद’वरुन तरुणाच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल 

ऑनलाईन टीम / राजसमंद :

‘लव्ह जिहाद’वरुन तरुणाची हत्या करुन त्याचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील राजसमंद येथे घडली. याबाबतचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लव्ह जिहाद थांबवले नाही, तर जिहादींची अशीच अवस्था केली जाईल, अशी धमकी त्याने या व्हिडिओत दिली आहे. दरम्यान, राजसमंद येथील एका हॉटेलपासून जवळच निर्जन रस्त्यालगत बुधवारी अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. याच सुमारास राजसमंदमध्ये ‘लव्ह जिहाद’चा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला. बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी या व्हिडिओत जाळलेल्या तरुणाचाच मृतदेह सापडल्याचे स्पष्ट केले.

मोहम्मद शेख असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो मजूर म्हणून काम करत होता. तर त्याची हत्या करणाऱया तरुणाचे नाव शंभूनाथ रायगर असे आहे. व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी शंभूनाथला अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर देशभरात संतापाची लाट उसळली. दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापनाही करण्यात आली आहे. या घटनेनंतर उदयपूर आणि परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

Related posts: