|Thursday, December 13, 2018
You are here: Home » उद्योग » युएएन बरोबर जोडता येतील 10 खाती

युएएन बरोबर जोडता येतील 10 खाती 

नवी दिल्ली /वृत्तसंस्था :

कर्मचाऱयांसाठी निवृत्तीवेतन देणारी संघटना कर्मचारी भविष्यनिधी संघटनेने नवीन सुविधा देण्याची घोषणा केली आहे. या नवीन घोषणेनुसार देशातील 4.5 कोटी सदस्यांना वेगवेगळय़ा पीएफ खात्यासाठी युनिव्हर्सल अकाऊंट नम्बरचा वापर करत एकत्र सर्व खाती वापरता येतील. संघटनेच्या या निर्णयामुळे सक्रिय सदस्य एकाच वेळी आपली दहा खाती जोडू शकतात. सध्या संघटनेच्या सदस्यांना वेगवेगळय़ा खात्यासाठी नव्याने दावा करावा लागत आहेत.

संघटनेच्या या निर्णयामुळे त्यांचे काम सहजसोपे होईल. ‘एक कर्मचारी, एक ईपीएफ खाते’ सुरू करण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे. ही नवीन योजना देशभरातील 120 पेक्षा जास्त विभागीय कार्यालयांना सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. याचप्रमाणे सदस्यांना आपल्या पीएफ खात्यांची जोडणी करत सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आल्याचे संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.  ही सुविधा संघटनेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Related posts: