|Thursday, October 18, 2018
You are here: Home » उद्योग » ठेवीदारांचे बँकेतील पैसे सुरक्षित राहणार : जेटली

ठेवीदारांचे बँकेतील पैसे सुरक्षित राहणार : जेटली 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

आर्थिक सुरक्षा आणि ठेव विमा विधेयक (एफआरडीआय), 2017 हे खातेदारांसाठी ठेवीसाठी अधिक सुरक्षा देण्यासाठी आणि त्यांच्यासाठी योग्य असल्याचे सांगत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी समर्थन केले. सदर विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठविण्यात आले असून ग्राहकांच्या हितांचे पूर्णपणे संरक्षण करण्यात येईल. सरकार यासाठी योग्य ती पावले उचलत आहेत, असे त्यांनी म्हटले.

बँका दिवाळखोरीत येण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांना मदत करण्यासाठी हे एफआरडीआय विधेयक काही सुधारित प्रस्तावांनुसार सादर करण्यात येईल. या विधेयकाचा प्रस्ताव तयार आहे. संसदेच्या शीतकालीन अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येईल. बँक खातेदार आणि बँकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी सर्व ते उपाय करण्यात येतील असे त्यांनी म्हटले.

या विधेयकात काही वादग्रस्त मुद्दे असल्याचे सांगण्यात आहे. बँकांची आर्थिक स्थिती कमजोर झाल्यास ठेवीदारांच्या पैसांचा वापर करण्याचा अधिकार देण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. हा कायदा लागू करण्यात आल्यानंतर जुना कायदा निष्प्रभावी होईल, या कायद्यानुसार बँकांना सरकारकडून गॅरन्टी देण्यात येते. बँकांची आर्थिक स्थिती कमजोर झाल्यास कोणत्याही ठेवीदारांचे 1 लाख अथवा त्यापेक्षा अधिक ठेव असल्यास बँकेला पुन्हा मजबुतीकरणासाठी त्याचा वापर करण्यात येईल आणि यामुळे ग्राहकांना खात्यातून पैसे काढणे कठीण होईल असे काही माध्यमांनी म्हटले आहे.

सध्या प्रत्येक ठेवीदाराला 1 लाख रुपयापर्यंतच्या ठेवीला ठेव विमा आणि क्रेडिट गॅरन्टी महामंडळाकडून सुरक्षा पुरविण्यात येते. एक लाख रुपयांपेक्षा जास्त ठेव असल्यास बँकेकडून कोणत्याही प्रकारची सुरक्षा पुरविण्यात येत नाही आणि असुरक्षित क्रेडिटर्सच्या दावानुसार ती समजली जाते.

अन्य कोणत्याही कायद्यापेक्षा एफआरडीआय विधेयकात ठेवीदारांच्या हितांचे संरक्षण करण्यात आले आहे. सरकारी बँकांसाठी सरकारकडून कोणत्याही प्रकारचे बदल केले नाहीत.

 

Related posts: