|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » उद्योग » चीनच्या भारतातील गुंतवणुकीत घट

चीनच्या भारतातील गुंतवणुकीत घट 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

चिनी कंपन्या भारतातील गुंतवणुकीत कपात करत आहेत. इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या अहवालानुसार 60 देशातील चीनच्या गुंतवणुकीचा अभ्यास करण्यात आल्यानंतर ही बाब समोर आली आहे. चिनी कंपन्या आता सिंगापुरमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करत आहेत. चिनी गुंतवणूक आपल्याकडे वळविण्यासाठी भारताला अपयश येत आहे. चिनी गुंतवणुकीबाबत भारताचे स्थान 6 ने घटत 37 व्या स्थानावर पोहोचले आहे. या यादीमध्ये पहिल्यांदा अमेरिका अव्वल स्थानी होता, मात्र आता त्याची जागा सिंगापुरने पटकावली आहे. यानंतर हाँगकाँग, मलेशिया, ऑस्ट्रेलिया यांचा पहिल्या पाच देशांमध्ये समावेश आहे. चिनी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करताना काही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र हय़ुवावेई आणि शाओमी यासारख्या कंपन्या चांगला व्यवसाय करत आहे. ई व्यापार क्षेत्रातही त्या कंपन्या चांगली गुंतवणूक करत आहेत. भारतात गुंतवणूक करण्यास अनेक संधी असल्याचे म्हणण्यात आले आहे.

Related posts: