|Saturday, January 19, 2019
You are here: Home » उद्योग » सलगच्या घसरणीनंतर बाजारात तेजी परत

सलगच्या घसरणीनंतर बाजारात तेजी परत 

मुंबई / वृत्तसंस्था :

सलग काही सत्रात बाजारात दबाव आल्याने गुरुवारी बाजारात दमदार तेजी आली. सेन्सेक्स 1 टक्का आणि निफ्टी 1.25 टक्क्यांनी वधारत बंद झाला. दिवसातील तेजी दरम्यान निफ्टी 10,180 आणि सेन्सेक्स 33,000 पर्यंत वधारला होता.

बीएसईचा सेन्सेक्स 352 अंशाने वधारत 32,949 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 122 अंशाने मजबूत होत 10,166 वर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात चांगलीच तेजी आली होती. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 1.4 टक्क्यांनी वधारत 16,894 वर बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 1.5 टक्क्यांनी मजबूत होत 19,831 वर बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 1.3 टक्क्यांनी वधारत 18,031 वर बंद झाला.

दिवसात बाजारात चांगलीच तेजी आली होती. वाहन, धातू, मीडिया, पीएसयू बँक, रिअल्टी, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा आणि तेल आणि वायू समभागात जोरदार खरेदी झाली. बँक निफ्टी 0.8 टक्क्यांनी वधारत 25,057 वर बंद झाला.

दिग्गज समभागांची खरेदी

गेल, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, यूपीएल, टाटा पॉवर, एशियन पेन्ट्स, मारुती सुझुकी, टाटा स्टील, आणि बजाज ऑटो 8-2.8 टक्क्यांनी वधारले. कोल इंडिया, टीसीएस, सिप्ला, विप्रो, सन फार्मा 0.9-0.25 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात अदानी पॉवर, अल्केम लॅब, पेट्रोनेट एलएनजी, अजंता फार्मा, राजेश एक्स्पोर्ट 6.1-4.5 टक्क्यांनी मजबूत झाले. एम्फेसिस, सीजी कंम्युमर, पी ऍण्ड जी, ईमामी, ग्लेनमार्क 1.5-0.75 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात सोरिल इन्फ्रा, एलटी फुड्स, पुर्वांकरा, ऍक्सिसकॅड्स इंजीनियरिंग, ट्रायजिन टेक 20-13.3 टक्क्यांनी वधारला. 63 मूंह टेक, पोकरण, पिनकॉन स्पिरिट, रुचि सोया, बटरफ्लाय 19.9-5 टक्क्यांनी घसरला.

Related posts: