|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » चौकाला छत्रपतींचा नामोल्लेख करा!

चौकाला छत्रपतींचा नामोल्लेख करा! 

मराठा समाजाच्यग्नावतीने नगर पंचायतीला निवेदन

वार्ताहर / कणकवली:

कणकवली शहरातील शिवाजी चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक   व शिवाजीनगरचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज असे करण्यात यावे, या मागणीसाठी कणकवलीतील सकल मराठा समाजाच्यावतीने नगराध्यक्षा माधुरी गायकवाड व मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना निवेदन देण्यात आले. या दोन्ही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा नामोल्लेख एकेरी असू नये, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी कणकवलीतील बहुसंख्य मराठा समाज बांधव उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्र व हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आहेत. कणकवली शहरातील पं. स. कडील तेलीआळी येथील चौक व शिवाजीनगर भागात छत्रपती शिवाजीमहाराजांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. मात्र, छत्रपतींचा एकेरी नावाने अनेकदा उल्लेख केला जात असल्याने मराठा समाजाच्या मागणीनुसार हे नामकरण आदरपूर्वक करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मराठा समाजाच्यावतीने ही मागणी येत्या 30 दिवसात पूर्ण न झाल्यास, सकल मराठा समाजाच्यावतीने या दोन्ही ठिकाणी वरीलप्रमाणे नामकरणाचे फलक लावण्यात येतील याची नोंद घ्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.

Related posts: