|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चोरीचा प्रयत्न करणाऱया दोघांना सक्तमजुरी

चोरीचा प्रयत्न करणाऱया दोघांना सक्तमजुरी 

साक्षीदार फुटले असतानाही न्यायालयाने ठरवले दोषी

सरकारी पक्षातर्फे ऍड.सोबिना फर्नांडिस यांचा युक्तिवाद

प्रतिनिधी /रत्नागिरी

एमआयडीसी उद्यमनगर येथील घरामध्ये चारीचा प्रयत्न करणाऱया दोघा संशयित आरोपींना गुरूवारी जिल्हा मुख्य न्यायालयाने दोषी ठरवत चार महिने सक्तमजुरी व 200 रूपये दंड व दंड न भरल्यास 10 दिवस सक्तमजुरीची शिक्षा ठोठावल़ी या निकालाचे वैशिष्टय़ म्हणजे साक्षीदार फुटले असताना देखील न्यायालयाने परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य मानून आरोपींना दोषी ठरवल़े

श्यामराव भाऊराव जानकर व सागर चंद्रकांत सातपुते (ऱा दोघेही उसगाव त़ा करवीर ज़ि कोल्हापूर) अशी या दोघा आरोपींची नावे आहेत़ 17 डिसेंबर 2014 रोजी हे दोन्ही आरोपी कोल्हापूरहून गणपतीपुळे येथे दुचाकी घेवून फिरण्यासाठी आले होत़े त्यानंतर त्यांनी चोरी करण्यासाठी उद्यमनगर येथील बंद घराची निवड केली होत़ी

गणपतीपुळे येथील दर्शन घेवून सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आरोपींनी उद्यमनगर येथील बंद घरावरच्या टेरेसवरून आत शिरण्याचा प्रयत्न करत असताना यातील दोघेही आरोपी घराच्या टेरेसवर चढल्याचे तेथील रहिवासी महम्मद अहमद नाखाडे यांनी पाहिल़े त्यांना हा चोरीचा प्रकार असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आराडाओरडा करण्यास सुरूवात केल़ी तसेच स्थानिक रहिवाशांच्या मदतीने त्यांनी सागर सातपुते या आरोपीला टेरेसवरून ताब्यात घेतल़े तर अन्य आरोपी श्यामराव जानकर यांनी तेथून पळ काढला होत़ा यावेळी रहिवाशांना टेरेसच्या दरवाजाची कडी वाकवून तो तोडण्याचा प्रयत्न आरोपी करत असल्याचे लक्षात येताच या घटनेची खबर त्यांनी पोलिसांना दिल़ी

या प्रकरणी पोलिसांनी दुसरा आरोपी श्यामराव जानकर याला ताब्यात घेवून दोघा आरोपींविरूद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा गुरूवारी या प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी ब़ी एस़ झंवर यांनी सुनावणी करत दोघा आरोपींना 4 महिने सक्तमजुरी व 200 रूपये दंड व दंड न भरल्यास 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावल़ी सरकारी पक्षातर्फे ऍड. सोबिना फर्नांडिस यांनी युक्तिवाद केला तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल अनंत जाधव व कोर्ट डय़ुटीचे काम पोलीस नाईक बाजीराव कदम यांनी पाहिल़े

Related posts: