|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » डीकेटीईच्या प्रणिल वोरा याच्या संशोधनास जर्मनीत पुरस्कार

डीकेटीईच्या प्रणिल वोरा याच्या संशोधनास जर्मनीत पुरस्कार 

प्रतिनिधी /इचलकरंजी :

येथील डिकेटीईमध्ये टेक्स्टाईल टेक्नॉलॉजीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी प्रणिल संजय वोरा याला जर्मनीतील आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये सादर केलेल्या संशोधन प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला. या पुरस्काराअंतर्गत वोरा यास इडाना व युरोपकडून आयोजीत इंटरनॅशनल नॉनओव्हन सिंपोझियम मध्ये जाण्याची संधी व एक वर्षाची इडाना मेंबरशिप मोफत मिळणार आहे.

या कॉन्फरन्समध्ये जगभरातून निवड झालेल्या एकूण 15 विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केला होता. यामध्ये प्रणिल वोरा याने नॉनवोव्हन एअर फिल्टर्स फॉर पेट्रोल व डीजेल इंजिन या विषयावर प्रकल्पाचे सादरीकरण केले. या फिल्टरचा वापरय पेट्रोल व डिजेलच्या इंजिनमध्ये केल्यास धुराच्या स्वरूपात बाहेर पडणाऱया कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण कमी होते. त्यामुळे प्रदुषणास आळा बसतो व इंजीनचे ऍव्हरेजही वाढते. तांत्रिकदृष्टय़ा महत्त्वाच्या या समाजोपयोगी प्रकल्पास प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. यानिमित्ताने देशभरातील संशोधकांशी चर्चा करण्याची संधी प्रणिल वोरा याला मिळाली. यावेळी त्याने नॉनवोव्हन विषयावर संशोधन करणारी जगातील सर्वात मोठी रिर्सच इन्स्टिटय़ूट असणाऱया सेक्सॉन टेक्स्टाईल रिसर्च इस्न्टिटय़ूट च्या विविध विभागांना भेटी दिल्या.

प्रणिल वोराच्या या कौशल्याने प्रभावित होवून श्रीमती नताचा डिफेचे, इडाना, युरोप, मार्केटींग अँड मेंबर एगेंजमेंट डायरेक्टर यांनी डिकेटीईस भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

 

Related posts: