|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सिध्दनेर्ली, नदिकिनारा येथे राष्ट्रवादीचा रास्ता रोको

सिध्दनेर्ली, नदिकिनारा येथे राष्ट्रवादीचा रास्ता रोको 

वार्ताहर /सिध्दनेर्ली :

कागल तालुक्यातील नदिकिनारा ते एकोंडी रस्ता मोठय़ा प्रमाणात खाच खळग्यांनी व्यापला आहे. रस्त्यात खड्डे की खडय़ात रस्ता  असा सवाल करुन राष्ट्रवादी        काँग्रेसकडून हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी सिध्दनेर्ली, नदिकिनारा येथे रास्ता रोको करण्यात आला.

यावेळी आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, सध्या ग्रामीण भागातील रस्ते मोठय़ा प्रमाणात खराब झाले आहेत. भाजप सरकार याकडे लक्ष देत नाही. लवकरात लवकर या रस्त्यासाठी निधी देवून हा रस्ता पुढील महिन्याभरात पूर्ण करावा,  अन्यथा तीव्र आंदोलन करुन बेमुदत रास्तारोको करण्यात येईल.

यावेळी कॉ. शिवाजी मगदूम म्हणाले, भाजप सरकार हे घोषणाबाजी व जाहीरातबाजीवर जोर देत आहे. प्रत्यक्ष कामकाज काहीही नाही. जाहिरातबाजी करत असताना प्रत्यक्ष विकास करायला सरकारला वेळच मिळत नाही. अशा सरकारला योग्य ती जागा दाखविण्याची वेळ आली आहे. यावेळी दत्ता पाटील-केनवडेकर, एकोंडीचे सरपंच शामराव सुदर्शनी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भैय्या माने, प्रकाश गाडेकर, रमेश तोडकर, बळवंत माने, सुधीर पाटोळे, सुधीर वाईंगडे, दत्तात्रय पाटील, कृष्णात मेटील, युवराज पाटील (बामणी), नेताजी मोरे (व्हन्नूर) तसेच पंचक्रोशितील राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Related posts: