|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सेकंड स्टेट स्केटथलॉन ऍण्ड वेव बोर्ड स्पर्धेत नागपूरला चॅम्पियनशीप ट्रॉफी

सेकंड स्टेट स्केटथलॉन ऍण्ड वेव बोर्ड स्पर्धेत नागपूरला चॅम्पियनशीप ट्रॉफी 

प्रतिनिधी  /कोल्हापूर :

येथील वि. स. खांडेकर स्केटींग ग्राऊंडवर पार पडलेल्या स्टेट स्केटलथॉन ऍण्ड वेव बोर्ड स्पर्धेत कोल्हापूर-नागपूर जिल्हय़ाने प्रथम क्रमाक मिळवला. या स्पर्धा स्केटथलॉन ऍण्ड वेव बोर्ड स्पोर्टस् महाराष्ट्र असोसिएशन तर्फे घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन महेस जाधव, भूपाल शेटे, चंद्रकांत जाधव, कपिल मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेतील विजेते- नागपूर-कोल्हापूर (सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल, शिरोली) जिल्हा प्रथम. द्वितीय क्रमांक घोडावत स्कूल व तृतीय क्रमांक पुणा जिल्हा. या स्पर्धेत 450 स्केटर्सनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत नागपूर, पुणा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, नाशिक, मुंबई, ठाणे, जालना, औरंगाबाद या जिल्हय़ांचा सहभाग होता.

स्पर्धा पार पाडण्यासाठी सचिव सुहास कारेकर, जयराम जाधव, सचिन इंगवले, विशाल देसाई, सुरज शिंदे, सोफिया मुल्ला, मनोज यादव, विनोद कदम, नायडू, पल्लवी शिंदे, सुजय पवार, रविंद्र मिसाळ, विलास देशपांडे, प्रथमेश लोंडे, सोळंकी, राहूल बिलजी, स्वरुप पाटील, विनायक पाटील यांनी सहकार्य केले.

Related posts: