|Thursday, November 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » समतावादी समाज व्यवस्थेसाठी धर्मनिरपेक्ष शासनाची गरज

समतावादी समाज व्यवस्थेसाठी धर्मनिरपेक्ष शासनाची गरज 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

राष्ट्रवादातून भारतीय संविधानाची निर्मिती झाली आहे. भारतीय संविधान हे राजसत्तेलाच वेसन घालत नाही तर धर्माच्या क्षेत्रातही हस्तक्षेप करायला परवानगी देते. राज्यघटनेने बहाल केलेले सर्वांचे हक्क व अधिकार अबाधित राखण्यासाठी  धर्माला बाजुलाच ठेवले पाहिजे. आज समतावादी समाज व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष शासन ही भारताची गरज आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांनी व्यक्त केले.

शाहू स्मारक भवन येथे श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने अवि पानसरे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्य़ानमालेतंर्गत बुधवारी ‘धर्मनिरपेक्ष शासनाची गरज’ या विषयावर किशोर बेडकिहाळ यांनी विचार मांडले. अध्यक्षस्थानी कॉम्रेड दिलीप पोवार होते.

यावेळी बेडकिहाळ म्हणाले, युरोपात ख्रिस्ती धर्माचा व्यापक प्रमाणात प्रसार झाल्यानंतर राजसत्ता व चर्च एकत्र आले. त्यांनी इतर लोकांना गुलाम बनवले. त्यामुळे तेथे ख्रिश्चन हा एकच धर्म राहिला. युरोपमधील विविध टप्प्यांतील कालखंडात धर्माच्या नावाखाली लोकांवर अत्याचार झाले. मात्र, एका टप्प्यावर विज्ञानाने काही नवीन सत्याची मांडणी केली. ती नाकारता येवू शकत नसल्याने धर्म व विज्ञान यांच्यात संघर्षही झालेला दिसतो.

Related posts: