|Sunday, August 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रोजगाराचे काय झाले?

रोजगाराचे काय झाले? 

राहुल गांधी पंतप्रधान मोदींना रोज एक प्रश्न विचारत आहेत. गुरुवारी पहिल्या टप्प्याच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी त्यांनी मोदींना रोजगार निर्मितीच्या आश्वासनाचे काय झाले? तसेच पुन्हा एकदा गब्बरसिंग या संज्ञेचा संदर्भ देत गब्बरसिंगने गुजरातमधील जमीन हडप केली, शेतकऱयांना बेरोजगार बनविले, असे त्यांनी का केले? याचे उत्तर पंतप्रधानांना द्यावे लागेल, अशी टिप्पणी केली.

बुधवारी त्यांनी पंतप्रधानांना गुजरातमधील बालकांच्या कुपोषणाबाबत प्रश्न विचारला होता. तसेच बालमृत्यूच्या समस्येचाही उल्लेख केला होता. मोदींनी आपल्या जाहीर सभांमधून या प्रश्नांना उत्तरे दिली असून गुजरातमध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत बऱयाच मुद्दय़ांवर मोठी प्रगती झाली आहे, असा दावा भाजप सूत्रांनी केला आहे. गेल्या 22 वर्षात राज्यात पायाभूत सुविधा सुधारल्या आहेत. वीजपुरवठा आणि पाणीपुरवठय़ाची परिस्थिती योग्य आहे. तसेच रोजगार निर्मितीही मोठय़ा प्रमाणावर झाली असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

 

Related posts: