|Saturday, January 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पंतप्रधान मोदी नीच माणूस!

पंतप्रधान मोदी नीच माणूस! 

गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन शिगेला पोहोचला असताना काँग्रेसचे ज्ये÷ नेते मणिशंकर अय्यर यांच्या एका अश्लाघ्य विधानामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीच मनुष्य आहेत, असे त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना विधान केले. त्यामुळे काँग्रेस पक्षाचीही कोंडी झाली असून मणिशंकर अय्यर यांनी क्षमायाचना करावी, अशा सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत.

गुजरातच्या प्रचार दौऱयावर असलेले पंतप्रधान मोदी यांनी या विधानाचा खरपूस समाचार घेतला असून यातून काँग्रेसची संस्कृती पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे, अशी टीका केली. आपण प्रत्युत्तर देताना इतक्मया खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही, असेही प्रतिपादन त्यांनी केले. काँग्रेसची ही मोगलाई मनोवृत्ती असून याची फळे त्यांना गुजरात निवडणुकीत भोगावी लागतील, असा इशारा त्यांनी दिला.

गुजरातमध्ये आतापर्यंत गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस नेत्यांनी अशीच निर्लज्ज विधाने केली आहेत. त्याचा त्यांना फटकाही बसला आहे. तरीही ते शहाणे होण्यास तयार नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा जबर दणका बसणे निश्चित आहे, असे वक्तव्य मोदींनी केले.

काँग्रेसच्या एका कुटुंबाने नेहमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, असे विधान मोदी यांनी दाहोदच्या सभेत केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना अय्यर यांनी मोदी नीच असल्याचे म्हटले होते. आता हे विधान गुजरातच्या निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनण्याची शक्मयता आहे. काँग्रेसने ही शक्मयता लक्षात घेऊन सारवासारवी सुरू केली आहे. नेते राहुल गांधी यांनी अय्यर यांना क्षमायाचना करण्याची सूचना केली आहे.

 

Related posts: