|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चिकोडीत गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा शुभारंभ

चिकोडीत गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा शुभारंभ 

वार्ताहर /चिकोडी :

येथील ब्रम्हचैतन्यधाम श्रीराम मंदिर येथे श्री गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. दररोज पहाटे काकडा, सामुहिक आरती, नित्यपाठ, नामजपयज्ञ, इष्टदेवतांचे अभिषेक, दुपारी महाआरती व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे.

सायंकाळी आरती, हरिपाठ, शेजारती सुरू आहे. गुरुवार 14 रोजी पहाटे 5.55 ला गुलाल, पुष्पवृष्टी करून दुपारच्या महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार असल्याचे चैतन्यदास महाराज यांनी सांगितले.

Related posts: