|Monday, December 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » केएलई संस्थेचे योगदान मोलाचे

केएलई संस्थेचे योगदान मोलाचे 

चिकोडी :

आरोग्यवंत समाज निर्मितीसाठी केएलई संस्थेने दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करून ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची चांगली सोय केल्याचे प्रतिपादन आमदार महांतेश कवटगीमठ यांनी केले.

येथील डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पीटलच्या प्रथम वार्षिकोत्सव दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम केएलई विश्वविद्यालय, डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पीटल, वैद्यकीय संशोधन केंद्र, दूधगंगा-कृष्णा सहकारी साखर कारखाना, शिवशक्ती शुगर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

कवटगीमठ पुढे म्हणाले, केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. कोरे यांचा चिकोडी शहरात सुसज्ज केएलई हॉस्पीटल काढण्याचा मानस होता. त्याची दखल घेत त्यावेळचे नगराध्यक्ष जगदीश कवटगीमठ यांनी नगरपालिकेच्या अधिपत्याखालील बसवसर्कल लगतची 35 गुंठे जमीन केएलई संस्थेस दिली. त्याच जागेवर हे सुसज्ज हॉस्पीटल उभे असून त्याचा हजारो रुग्णांना लाभ मिळत आहे. रुग्णांच्या सोयीसाठी हॉस्पीटललगतची संपादना चरमूर्ती मठाच्या मालकीची जागाही मठाकडून देण्यात आली आहे. तसेच केएलई संस्थेस 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यात 27 मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करून 1 लाख रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ मिळवून दिल्याचे सांगितले.

शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी केएलई हॉस्पिटलच्या 19 विभागातील 250 तज्ञ वैद्याधिकाऱयांनी सहभाग घेतला होता. शिबिरात आरोग्य तपासणी, स्त्राrरोग, कुपोषित बालके, चर्मरोग, दंत समस्या, हृदयरोग, कान-नाक-घसा समस्या, मुत्राशय समस्या, मुळव्याध, लहान मुलांच्या समस्या आदी समस्या असणाऱया 6 हजारहून अधिक रुग्णांची मोफत तपासणी करून औषोधोपचार देण्यात आले.

Related posts: