|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सदाशिव आयोग शिफारशीसाठी 11 रोजी चलो बेंगळूर

सदाशिव आयोग शिफारशीसाठी 11 रोजी चलो बेंगळूर 

वार्ताहर /बेडकिहाळ :

न्या. ए. जे. सदाशिव आयोगाच्या शिफारशीसाठी नोव्हेंबर 2017 पासून कुडलसंगमपासून बेंगळूरपर्यंत पदयात्रा काढण्यात आली आहे. यासाठी 11 डिसेंबर रोजी बेंगळूर येथे मातंग समाज महामेळावा होणार आहे. या मेळाव्यातून सिद्धरामय्या सरकारला न्या. ए. जे. सदाशिव आयोगाची शिफारस केंद्र सरकारला पाठविण्यासाठी आग्रह करून धारेवर धरण्यात येणार आहे. तेव्हा मातंग समाजातील प्रत्येक कार्यकर्ते, नागरिकांनी 11 रोजी चलो बेंगळूर यासाठी सहभागी होण्याचे आवाहन हुन्नरगी मातंग समाज अध्यक्ष शंकर कांबळे यांनी केले आहे.

हुन्नरगी येथील मातंग समाजाच्या समुदाय भवनात आयोजित समाज बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीत सर्वानुमते विविध विषयांवर चर्चा करून 11 डिसेंबर रोजी हुन्नरगीसह परिसरातील मातंग समाजातील असंख्य कार्यकर्ते बेंगळूरकडे रवाना होणार आहेत.

सिद्धरामय्या यांनी हा आयोग केंद्र सरकारला पाठविला नाही तर पुढील येणाऱया विधानसभा निवडणुकीवर चांगलाच धडा मातंग समाज शिकवेल. तर यासाठी अन्य कोणत्याही पक्षाने पाठिंबा दर्शविला तर त्यांना कर्नाटकातील समस्त मातंग समाज त्यांच्या पाठीशी राहिल, असा इशारा या बैठकीतून कार्यकर्त्यांनी दिला आहे.

बैठकीस भिमराव कांबळे, महेश कांबळे, सुधाकर कांबळे, सुभाष ऐवाळे, मारुती सनदी, राहुल कांबळे यांच्यासह हुन्नरगीसह परिसरातील कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

Related posts: