|Sunday, October 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आक्षेपार्ह पोस्टरप्रकरणी एकास अटक

आक्षेपार्ह पोस्टरप्रकरणी एकास अटक 

प्रतिनिधी /निपाणी :

 सोशल मीडियावर जातीवाचक पोस्ट टाकल्याप्रकरणी शहर पोलिसांनी गुरुवारी सकाळी एकास अटक केली. राकेश गंगाराम माने (रा. भिमनगर, तिसरी गल्ली) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. सदर पोस्टप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्याने जातीय तणाव निवळला. परिणामी राकेश याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

 याबाबत अधिक माहिती, बुधवारी रात्री 8.30 च्या सुमारास राकेश माने याने मायाभाई ग्रुप या व्हॉट्सअप ग्रुपवर जातीवाचक पोस्ट टाकली. सदर ग्रुपवर सर्व जातीधर्माचे लोक असल्याने ही पोस्ट पाहून एका समाजाच्या भावना दुखावल्या. यातून बुधवारी रात्री भिमनगर परिसरात तणाव निर्माण झाला. सदर घटनेची माहिती मिळताच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संशयित राकेशला तत्काळ ताब्यात घेतले. त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कलम 295 अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.

यानंतर गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास शहर पोलीस स्थानकासमोर समाज बांधवांची मोठी गर्दी जमली. यावेळी घटनेचे गांभीर्य ओळखून डीवायएसपी बी. एस. अंगडी यांनी पोलीस स्थानकास तत्काळ भेट दिली. यावेळी जमलेल्या समाज बांधवांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी अंगडी यांनी संबंधितांवर कडक कारवाई करू जेणेकरून यापुढे असे प्रकार होणार नाहीत, असे आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला.

Related posts: