|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विद्यार्थ्यांची नाळ मातीशी जोडा

विद्यार्थ्यांची नाळ मातीशी जोडा 

बेळगाव / प्रतिनिधी :

आजचे विद्यार्थी हे मोबाईल व संगणकाच्या मोहजालात अडकले आहेत. त्यामुळे त्यांना भौतिक सुखच आपले जग असल्याचे वाटत आहे. या विद्यार्थ्यांची नाळ पुन्हा मातीशी जोडण्यासाठी संत मीरा मराठी माध्यम स्कूलने राबविलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. अशाप्रकारे इतरही शाळांनी उपक्रम राबवावे, असे आवाहन नाटय़ कलाकार व सिने अभिनेते प्रसाद पंडित यांनी केले.

गणेशपूर येथील संत मीरा मराठी शाळेच्या वतीने बुधवारी शिवाजी महाराजांवरील व्याख्यान देताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तसेच उद्घाटक म्हणुन उद्योजक मोहन इजारे उपस्थित होते. व्यासपीठावर विजय गोवेकर, लक्ष्मण पवार, मुख्याध्यापिका ज्योती कित्तुर उपस्थित होत्या.

 उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी उभारलेल्या किल्ल्यांचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने 4 किल्ले उभारले आहेत. तर ग्रामीण जीवन व बलुतेदारांचा माहितीपट दाखविण्यात आला आहे. ही सर्व शिवसृष्टी शनिवार दि. 9 पर्यंत दुपारी 2 ते रात्री 8 या वेळेत खुली असणार आहे. ज्या शिवप्रेमिंना ही शिवसृष्टी पहायची आहे त्यांनी आवर्जुन भेट द्यावी असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा पाटील यांनी केले. रामनाथ नाईक यांनी परिचय करून दिला. तर मुख्याध्यापिका ज्योती कित्तूर यांनी आभार मानले. विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील शिवप्रेमी या शिवसृष्टीला भेट देवून माहिती घेत आहेत.

Related posts: