|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जाणता राजा महानाटय़ाची उत्कंठा शिगेला

जाणता राजा महानाटय़ाची उत्कंठा शिगेला 

बेळगाव / प्रतिनिधी :

‘रयतेच्या गवताच्या काडीलाही धक्का पोहोचवू नका’ असा इशारा आपल्या सैनिकांना देणाऱया छत्रपती शिवरायांच्या विचारांची आज खरी गरज आहे. हेच शिवरायांचे विचार जनमानसामध्ये रूजविण्यासाठी तरूण भारत ट्रस्टने जाणता राजा हे महानाटय़ पुन्हा एकदा बेळगाव भेटीवर आणले आहे. येत्या शनिवार दि. 9 पासून सीपीएड मैदानावर हे भव्य दिव्य नाटक बेळगावकर रसिकांना पाहता येणार आहे. महानाटय़ाचा प्रयोग सुरू होण्यास अवघा एक दिवस शिल्लक राहिल्याने नाटक पाहणाऱयांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

तरूण भारतने वृत्तपत्र क्षेत्राबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. तरूण भारतचे समुह प्रमूख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सामाजिक व शैक्षणिक कार्य सुरू आहे. तरूण भारत ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक कार्याच्या हेतुने पुन्हा एकदा जाणता राजा हे महानाटय़ बेळगावमध्ये आणले जात आहे.

शनिवार दि. 9 पासून या महा नाटय़ाला सुरूवात होणार असून, त्यासाठीची पूर्व तयारी पूर्ण झाली आहे. मुख्य रंगमंच उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रंगमंचाच्या सभोवताली किल्ल्याच्या तटबंदी उभारण्यात आल्याने या संपूर्ण परिसराला एक किल्ल्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे नाटक पाहणाऱया प्रेक्षकांनाही  याचा वेगळा आनंद मिळणार आहे.

Related posts: