|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » धारवाड रोड ओव्हरब्रिजचे काम मार्चपर्यंत पूर्णत्वास?

धारवाड रोड ओव्हरब्रिजचे काम मार्चपर्यंत पूर्णत्वास? 

प्रतिनिधी /बेळगाव :

धारवाड रोड रेल्वे उड्डाणपूल डिसेंबर अखेर पूर्ण होईल, असे रेल्वे खात्याच्यावतीने सांगण्यात येत होते. मात्र सदर काम संथगतीने सुरू असल्याने निम्मे काम शिल्लक आहे. महिना अखेरपर्यंत पुलाचे काम पूर्ण होणे अशक्य आहे.  काम पूर्ण होण्यास मार्च महिना उजाडणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे वाहनधारकांना आणखी तीन महिने वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

रेल्वे खात्याचे दुर्लक्ष आणि कंत्राटदाराची चालढकल यामुळे धारवाड रोड उड्डाणपुलाचे काम लांबत चालले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन खासदारांनी दिले होते. मात्र खासदारांचे आश्वासन फोल ठरण्याची शक्मयता आहे. पुलाचे काम पूर्ण होण्यास आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागेल, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.   शहरातील दोन मुख्य मार्गांवरील उड्डाणपुलाचे काम करण्यात येत असल्याने वाहनधारकांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

धारवाड रोड उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर खानापूर रोड येथील उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी शहरवासियांनी केली होती. मात्र डिसेंबर अखेरपर्यंत धारवाड रोडवरील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. पण अद्याप निम्मेदेखील काम झालेले नाही. नऊ महिन्यात केवळ पिलर उभारून ट्रॉझल बिम उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. गर्डर ठेवण्यासह स्लॅब घालणे, दुसऱया बाजूच्या प्रवेशव्दाराच्या भिंतीचे बांधकाम करण्याचे काम शिल्लक आहे.

Related posts: