|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निवृत्त कर्नल जे. डी. स्टॅनली यांचे निधन

निवृत्त कर्नल जे. डी. स्टॅनली यांचे निधन 

बेळगाव / प्रतिनिधी :

मराठा रेजिमेंटमधील ज्ये÷ म्हणून ओळखले जाणारे निवृत्त कर्नल जे. डी. स्टॅनली यांचे गुरुवार दि. 7 रोजी निधन झाले. स्वातंत्र्य पूर्व काळापासून रेजिमेंटमध्ये कार्यरत राहून स्वातंत्र्योत्तर काळात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱया पेललेल्या या सेनानीच्या मृत्यूने मराठा लाईट इंन्फट्रीने दु:ख व्यक्त केले आहे.

29 ऑक्टोबर 1920 ला जन्मलेल्या जे. डी. स्टॅनली यांनी 14 मार्च 1943 मध्ये 14 मराठा लाईट इन्फंट्रीत सहभाग घेतला होता. दुसऱया जागतीक युद्धात पर्शिया, इराक, सायरिया, पॅलेस्टाईन आणि इजिप्तमध्ये त्यांनी मराठा  तुकडय़ांचे नेतृत्व केले होते. 1946 मध्ये मध्य पूर्वेतील जबाबदाऱया उरकून त्यांची नियुक्ती 2 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये करण्यात आली. 1960 ते 1964 पर्यंत ते तेथे कार्यरत राहिले. आणि विविध पदांची जबाबदारी निभावली.

1968 ते 1970 या निवृत्तीपूर्व काळात ते मराठा लाईट इन्फंट्रीच्या बेळगाव रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट म्हणून काम करत होते. 15 ऑक्टोबर 1970 ला ते निवृत्त झाले. सेंटरच्या अखत्यारित येणाऱया मिलीटरी महादेव मंदिरानजीक असलेल्या पॉप इन या स्नॅक जॉईंटची 1969 मध्ये स्थापना करण्यात त्यांची  महत्त्वाची भूमिका होती.

शुक्रवार दि. 8 रोजी बेळगावातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यावेळी मराठा लाईट इन्फंट्रीचे कर्नलपद भूषविणारे लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नू उपस्थित राहणार आहेत. स्टॅनली यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना मानवंदना देण्यासाठी त्यांचे पार्थिव रेजिमेंटच्या शरकत वॉर मेमोरियल येथे ठेवण्यात येणार असून, तेथे अंत्यदर्शन घेतले जाणार आहे.

Related posts: