|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » संतप्त शिवसैनिकांनी जिओ केबलचे काम बंद पाडले

संतप्त शिवसैनिकांनी जिओ केबलचे काम बंद पाडले 

प्रतिनिधी / महाबळेश्वर :

नाताळ हंगाम तोंडावर आला असतानाच रिलायन्स जिओ व्होडाफोन या दोन टेलीकम्युनिकेशन कंपनीने पांचगणी व महाबळेश्वर या दरम्यान रस्ता खुदाई करून केबल टाकण्याचे सुरू केलेले काम आज संतप्त शिवसैनिकांनी बंद पाडले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी या कामावर असेलेल्या कामगारांना काम बंद करण्यासच सांगितले नाही तर गेली दोन दिवस खोदलेला रस्ताही बुजवुन घेण्यात आला 

        महाबळेश्वर पांचगणी हा रस्ता राजमार्ग म्हणुन ओळखल जातो दोन्ही बाजुला घनदाट जंगल असल्याने या रस्त्या वरून जेमतेम दोन वाहने जावु शकतात नाताळ हंगामात येथे मोठया प्रमाणाव पर्यटक हजेरी लावतात त्या मुळे या रस्त्यावर वाहनांची संख्या वाढते वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वाहन ओलांताही येत नाही त्या मुळे अवजड वाहनांच्या मागे लहान वाहनांची मोठी रांग लागते अशा वेळीच जर रस्ता खुदाई केली तर या खुदाई मुळे मुळात अरूंद असलेला रस्ता अधिकच अरूंद होणार मग या अरूंद झालेल्या रस्त्यावर मोठी वाहतुकीची कोंडी होणार अशा वाहतुकीच्या कोंडीमध्ये हजारो पर्यटक अटक्ण्याची शक्यता नाकारता येत नाही नाताळ हंगाम काही दिवसांवर येवुन ठेपला आहे गेली दोन दिवसांपासुन जिओ व व्होडाफोन या दोन कंपनीने आपले रस्त्याच्या कडेने खुदाई करून केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे या खुदाईची माती रस्त्याच्या कडेला पडली असल्याने गेली दोन दिवस या भागात वाहतुकीची कोंडी होत आहे या संदर्भात अनेक नागरीकांनी व पर्यटकांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या आज दुपारी जिल्हा प्रमुख यांनी युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन वागदरे शहर प्रमुख विजय नायडु व इतर अनेक शिवसैनिकांना बरोबर घेवुन ज्या रस्त्यावर केबल टाकण्याचे काम सुरू होते तेथे जावुन पाहणी केली असता या खुदाई मुळे वाहतुकीची कोंडी होताना दिसली तसेच खुदाईची माती मोठया प्रमाणावर रस्त्याव पडल्याने रस्ता अरूंद झाला होता त्या मुळे संतप्त शिवसैनिकांनी केबल टाकण्याचे काम बंद पाडले व खोदलेले रस्ताही त्यांनी कामगारांकडुन बुजवुन घेतला 

Related posts: