|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कुंभमेळा हा भारताचा सांस्कृतिक ठेवा

कुंभमेळा हा भारताचा सांस्कृतिक ठेवा 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

भारतातील कुंभमेळय़ाला युनेस्को या जागतिक संस्थेने ‘सांस्कृतिक ठेवा’ म्हणून मान्यता दिली आहे. ‘मानवतेचा सांस्कृतिक संगम’ असे याचे वर्णन या संस्थेने केले आहे. ही घोषणा या संस्थेने ट्विटरवरून केली आहे. दक्षिण कोरियातील जेजू येथे सुरू असलेल्या संस्थेच्या बैठकीत ही मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीचा प्रारंभ 4 डिसेंबरला झाला असून ती 9 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

युनेस्को ही संयुक्त राष्ट्रसंघाची सांस्कृतिक विषयांशी निगडीत संस्था आहे. कुंभमेळय़ाला सांस्कृतिक ठेवा म्हणून मान्यता देण्याच्या या निर्णयाचे स्वागत केंद्रीय संस्कृती मंत्री महेश शर्मा यांनी केले आहे. अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे विशिष्ट कालखंडात कुंभमेळय़ाचे आयोजन केले जाते. यात लक्षावधी साधू तसेच सर्वसामान्य भाविकांचा सहभाग असतो. भारताच्या पुरातन गुरू-शिष्य परंपरेतून कुंभमेळय़ाच्या प्रथेचे जतन झाले आहे. याचही नोंद युनेस्कोने घेतली आहे.

Related posts: