|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » क्रिडा » के. श्रीकांत मानांकनात चौथा

के. श्रीकांत मानांकनात चौथा 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

भारताचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतच्या तांज्या मानांकनात खूपच सुधारणा झाल्याचे दिसून येते नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या पुरूष बॅडमिंटनपटूंच्या ताज्या मानांकन यादीत श्रीकांत चौथ्या स्थानावर आहे. भारताचा आणखी एक नवोदित बॅडमिंटन लक्ष्या सेन याने 89 वे स्थान पटकाविले आहे.

मध्यंतरी तंदुरूस्तीच्या समस्येमुळे श्रीकांत चीन खुल्या तसेच हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होवू शकला नाही. पुढील आठवडय़ात सुरू होणाऱया दुबई सुपरसिरीज बॅडमिंटन स्पर्धेत श्रीकांत सहभागी होणार आहे. पुरूष बॅडमिंटनपटूंच्या ताज्या मानांकन यादीत भारताचे एच. एस. प्रणॉय आणि बी. साई प्रणित हे अनुक्रमे 10 व्या आणि 17 व्या स्थानावर आहेत. महिला बॅडमिंटनपटूंच्या मानांकन यादीत पी.व्ही. सिंधू तिसऱया तर सायना नेहवाल 10 व्या स्थानावर आहेत.

Related posts: